घरताज्या घडामोडीमहिला पोलिसाची चर्चा; आधी सांगितला पती, त्याची बायको येताच निघाला प्रियकर

महिला पोलिसाची चर्चा; आधी सांगितला पती, त्याची बायको येताच निघाला प्रियकर

Subscribe

नागपूर शहरात महिला पोलीस कर्मचाऱ्याची चर्चा.

प्रेमात आणि युद्धात सगळ काही माफ असते, असे म्हणतात. कारण प्रेमात पडलेली व्यक्ती मागचा पुढचा विचार न करता काहीही करु शकते. अशीच एक घटना नागपूरमध्ये घडली आहे. एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक जण याला कंटाळले असून केव्हा एकदा कोरोना जातो आणि सुरळीत आयुष्य सुरु होते, याकडे लोक डोळे लावून बसले आहेत. त्याच दरम्यान एक घटना समोर आली आहे.

नेमके काय घडले?

नागपूर शहर पोलीस दलात एक वेगळाच प्रकार घडला आहे. विशेष शाखेत कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले. त्यामुळे त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाईन करण्याचे आदेश देण्यात आले. या दरम्यान, महिला पोलीस कर्मचारी संजना (नाव बदललं आहे) हिला देखील क्वारंटाईन करण्यात आले होते. दरम्यान, आपल्या पतीलाही कोरोनाची भीती असल्याचे सांगून तिने त्याला पोलीस प्रशिक्षण केंद्रातच क्वारंटाईन करुन घ्या, असे सांगत त्याला देखील आपल्यासोबत पोलीस प्रशिक्षण केंद्रातच क्वारंटाईन करुन घेतले.

- Advertisement -

असे झाले उघड?

दरम्यान, आपला पती केंद्र सरकारच्या एका खात्यात कार्यरत असून गेल्या तीन दिवसांपासून घरी आला नसल्याने पतीचा शोध घेऊ लागली. त्याचवेळी त्या महिलेने आपल्या पतीच्या नेहमी संपर्कात असणारी महिला पोलीस कर्मचारी संजना हिला संपर्क केला. तिचा शोध घेत ती महिला पोलीस ठाण्यात दाखल झाली. मात्र, तिला अधिकारी सहकार्य करीत नव्हते. अशावेळी तिने बजाजनगर पोलीस ठाणे गाठले आणि आपला नवरा गेले तीन दिवस घरी परतला नसल्याने तक्रार करण्याचा निर्णय घेतला. तिने पोलिसांत लेखी तक्रार केल्यानंतर महिला पोलीस कर्मचारी संजना हिचा खोटारडेपणा उघडकीस आला.

महिला पोलीस कर्मचारी संजनाने आपला पती असल्याचे सांगत ज्या व्यक्तीला पोलीस प्रशिक्षण केंद्रातच क्वारंटाईन केले होते. तो तिचा पती नसल्याचे उघडकीस आले. जी व्यक्ती आपला तीन दिवस नवरा घरी परतला नसल्याचे सांगत तक्रार दाखल करण्यास आली होती. त्या महिलेचा तो पती असल्याचे समोर आले. दरम्यान, याबाबत महिला पोलीस कर्मचाऱ्याकडे चौकशी केली असता तो आपला नवरा नसून प्रियकर असल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले असून सध्या नागपूर पोलिसात या महिला पोलीस कर्मचाऱ्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पुणे : आयुक्त दिपक म्हैसेकर होम क्वारंटाईन; चालकाला कोरोनाची लागण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -