राष्ट्रवादीच्या जन्मापासूनच महाराष्ट्रात जातीचे राजकारण; राज ठाकरेंचा पुन्हा शरद पवारांवर आरोप

राष्ट्रवादीच्या जन्मापासूनच महाराष्ट्रात जातीचे राजकारण; राज ठाकरेंचा पुन्हा शरद पवारांवर आरोप

राष्ट्रवादीच्या जन्मापासूनच महाराष्ट्रात जातीय राजकारणाला सुरुवात झाली आहे. शरद पवार यांनी कधीही शिवाजी महाराजांचे नाव घेतले नाही. मुस्लिम मते जाण्याची भीती वाटल्यानेच इतर टोळ्या उभ्या करण्यात आल्या. त्यातून फंडिग गोळा करण्यात आले. 1999 पासून हे विष राज्यात कालवले गेले, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. (MNS Chief Raj Thackeray slams NCP Sharad Pawar)

राज ठाकरे सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादीवर टीका केली. “सध्या महाराष्ट्रात जे सुरू आहे, ते जातीच्या राजकारणासाठी सुरू आहे. याआधी जन्माला आलेल्या लोकांना इतिहास माहीत नसेल का, त्यांनी काय वाचलं नव्हतं. यांनाचा आता इतिहास कळायला लागला. यांनाच आता स्वाभिमान जागरूक झाला. हे सगळे राष्ट्रावादीपासून सुरू झाले आहे. राष्ट्रावादीच्या जन्मापासून या सगळ्यागोष्टी सुरू झाल्या आहेत”, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

“आतापर्यंत शरद पवार यांनी कधीच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले नाही. त्यांची भाषणं काढून बघा. व्यासपीठावर केवळ शाहु, फुले, आंबेडकर यांचीच नावे घेताता. शिवाजी महाराजांचे नाव नाही घेत. मी एकदा शरद पवारांची मुलाखत घेतली होती. तेव्हा त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यांनी शाहु, फुले आणि आंबेडकर यांना विचार आहेत, असे म्हटले होते”, असेही राज ठाकरेंनी सांगितले.

“ते असे बोलत असतील तर मग शिवाजी महाराजांना विचार नाहीत का? मुळ विचार शिवरायांचा आहे ना. मुळात शिवरायांचे नाव घेतले की, मुस्लिम मते जातात त्यानंतर कोणत्यातरी टोळ्या उभ्या करायच्या आणि मग त्यांच्याकडून शिवाजी महाराजांचे राजकारण करून घ्यायचे. त्यानंतर मराठा समाज आणि इतर समाजांमध्ये वाद कसा होईल हे बघायचे. महाराष्ट्रात 1999 हे विष कालवले गेले”, अशा शब्दांत पुन्हा एकदा राज ठाकरेंनी शरद पवारांवर निशाणा साधला.


हेही वाचा – आई वडिलांचे छत्र हरपलेल्यांसाठी मदतीचे शेकडोचे हात सरसावले

First Published on: December 1, 2022 12:44 PM
Exit mobile version