आम्हाला कितीही थांबवण्याचा प्रयत्न केलात तरी..,मनसे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकरांचा इशारा

आम्हाला कितीही थांबवण्याचा प्रयत्न केलात तरी..,मनसे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकरांचा इशारा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यास ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. त्याच पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या पोलिसांकडून मनसेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यास सुरूवात झाली आहे. मनसेचे कार्यकर्ते ज्याठिकाणी आहेत. त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करण्यास पोलिसांनी सुरूवात केली आहे. तुम्ही आम्हाला कितीही थांबवण्याचा प्रयत्न केलात, तरी मनसे आता थांबणार नाही, असा इशारा औरंगाबादचे मनसे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी राज्य सरकारला दिला आहे.

औरंगाबादचे मनसे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, कायद्याचं राज्य असताना सरकारला कायदा पाळता येत नाहीये का?, जर देशामध्ये कायद्याचं बोलायचं नाही तर देश कसं काय चालेल?, हा कायदा सर्वांसाठी समान आहे. त्याप्रमाणे कायद्यानुसार चालावं लागणार आहे. ज्याप्रमाणे अक्षय्य तृतीयाच्या दिवशी पोलिसांकडून नोटिसा देण्याचं काम केलं जातंय, त्याचा आम्ही निषेध करतो.

आम्ही सर्व पोलीस दलाला सहकार्य केलं आहे. याआधीही केलं आहे. परंतु ज्यापद्धतीने मनसेवर दडपशाहीने जी कारवाई करण्यात येत आहे, त्याचा मी तीव्र निषेध करतो. तुम्ही आम्हाला कितीही थांबवण्याचा प्रयत्न केलात, तरी मनसे आता थांबणार नाही. त्यामुळे राज ठाकरे जो काही आदेश देतील त्याचं पालन केलं जाईल, असं सुमीत खांबेकर म्हणाले.

जर एखादी गोष्ट चूकीची आहे. तर ती मांडायची नाही का?, जर ही गोष्ट मांडायची असेल तर ही गोष्ट करावीच लागेल. या गोष्टीसाठी कुणीतरी पुढाकार घ्यावा लागेल, असं सुमीत खांबेकर म्हणाले.


हेही वाचा : बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाईंना पोलिसांची नोटीस, मनसेची पुढील भूमिका काय?


 

First Published on: May 3, 2022 2:47 PM
Exit mobile version