उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्याच्या आड लबाडी लपवण्याचं सामर्थ्य; मनसेचा हल्लाबोल

उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्याच्या आड लबाडी लपवण्याचं सामर्थ्य; मनसेचा हल्लाबोल

अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला. शिवसेनेचे अधिकृत चिन्ह धनुष्यबाण निवडणूक आयोगाने गोठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेंकांवर टीका करत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच शिंदे आणि ठाकरे गटाच्या चिन्हाच्या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली आहे. शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवल्याने मनसेने उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला. शिवसेनेचे अधिकृत चिन्ह धनुष्यबाण निवडणूक आयोगाने गोठवलं असल्याने आता अंधेरी पोटनिवडणुकीसाठी हे चिन्ह शिंदे आणि ठाकरे यांना वापरता येणार नाही. तसंच, शिवसेनेच्या नावाचाही वापर करता येणार नाही. ठाकरे आणि शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे पक्ष आणि चिन्हाबाबत कागदपत्रे सादर केल्यानंतर निवडणूक आयोगाची शनिवारी 4 तासांची दिल्लीत बैठक झाली. या बैठकीनंतर चिन्ह आणि नाव गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शिवसेनेच्या इतिहासात गेली 33 वर्ष ‘धनुष्यबाण’ हा शिवसेनेची ओळख बनला होता. 1989 नंतरच्या सर्व निवडणुका शिवसेनेने धनुष्यबाणावर लढवल्या होत्या. शिवसेनेच्या हिंदुत्ववादी भूमिकेला धनुष्यबाणाचे चिन्ह पूरक असेच होते. त्याआधी म्हणजे 1968 मध्ये शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ढाल तलवार या चिन्हावर लढवली होती. 1980 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला रेल्वे इंजिन हे चिन्ह मिळाले होते. तर 1985 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना मशाल, बॅट बॉल अशी वेगळी चिन्हे मिळाली होती.


हेही वाचा – ढाल-तलवार ते धनुष्यबाण शिवसेनेने ‘या’ चिन्हांवर लढवल्या होत्या पूर्वीच्या निवडणुका

First Published on: October 9, 2022 10:05 AM
Exit mobile version