घरमहाराष्ट्रढाल-तलवार ते धनुष्यबाण, शिवसेनेने 'या' चिन्हांवर लढवल्या होत्या पूर्वीच्या निवडणुका

ढाल-तलवार ते धनुष्यबाण, शिवसेनेने ‘या’ चिन्हांवर लढवल्या होत्या पूर्वीच्या निवडणुका

Subscribe

मुंबई – अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे अधिकृत चिन्ह धनुष्यबाण निवडणूक आयोगाने गोठवलं असल्याने आता अंधेरी पोटनिवडणुकीसाठी हे चिन्ह शिंदे आणि ठाकरे यांना वापरता येणार नाही. तसंच, शिवसेनेच्या नावाचाही वापर करता येणार नाही. ठाकरे आणि शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे पक्ष आणि चिन्हाबाबत कागदपत्रे सादर केल्यानंतर निवडणूक आयोगाची आज चार तासांची बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीनंतर चिन्ह आणि नाव गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपाचा आहे. येत्या काळात निर्णय बदलला जाऊ शकतो.

हेही वाचा – मोठी बातमी! निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवलं, शिवसेना नावाच्याही वापरावर बंदी

- Advertisement -

१९८९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला पहिल्यांदा धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळाले होते. गेली ३३ वर्ष धनुष्यबाण हा शिवसेनेची ओळख बनला होता. १९८९ नंतरच्या सर्व निवडणुका शिवसेनेने धनुष्यबाणावर लढवल्या होत्या. शिवसेनेच्या हिंदुत्ववादी भूमिकेला धनुष्यबाणाचे चिन्ह पूरक असेच होते.

हेही वाचा – …तरीही खरी शिवसेना आम्हीच; निवडणूक आयोगाच्या निकालानंतरही दीपक केसरकर ठाम

- Advertisement -

त्याआधी म्हणजे १९६८ मध्ये शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ढाल तलवार या चिन्हावर लढवली होती. १९८०च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला रेल्वे इंजिन हे चिन्ह मिळाले होते. तर १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना मशाल, बॅट बाॅल अशी वेगळी चिन्हे मिळाली होती.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -