“आता तरी अक्कल येईल असे…”; मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

“आता तरी अक्कल येईल असे…”; मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील शिंदे गट आणि शिवसेना हा वाद आता आणखीनच चिघळत चालला आहे. शिवसेना आणि शिंदे गटातील आमदार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि खरी शिवसेना आमची असे बोलत आहेत. त्यामुळे राज्यातील सामन्य शिवसैनिकांना नेमकी शिवसेना कोणाची असा प्रश्न पडला आहे. अशातच त्यांच्या या वादामुळे शिवसेनेच्या विरोधी पक्षांनीही उद्धव ठाकरे यांच्या निशाणा साधण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार, शिवसेनेचे चिन्ह आणि खरी शिवसेने कोणाची या वादाच्या पार्श्वभूमीवर मनसेने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. (mns leader sandeep deshpande slams uddhav thackeray)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार दिपक केसरकर शिवसेनेचे नाव आणि चिन्ह असलेला बॅनर घेऊन जात आहेत. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत उभे असून, “चिंता करू नका साहेबांनी देलेले घड्याळ आहे आमल्याकडे”, असे बोलताना दाखवले आहे. हा फोटो ट्विट करत संदीप देशपांडे यांनी “आतातरी अक्कल येईल असे ‘चिन्ह’ दिसत नाही”, असे त्यांनी लिहिले आहे.

सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उठता-बसता बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेत आहेत. त्यांनी आपल्या मुख्यमंत्री दालनातही आपल्या खुर्चीच्या मागे बाळासाहेबांचा मोठा फोटो लावला आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे ते संजय राऊतांपर्यंत सारेच प्रत्येक पत्रकार परिषदेत बाळासाहेबांचा उल्लेख करत आहेत. स्वतःचे अस्तिव टिकण्यासाठी सुरू झालेले हे प्रतीक, अस्मिता आणि हिंदुत्वाचे राजकारण. विशेष म्हणजे खरे बाळासाहेब माझे, खरी शिवसेना आमची आणि खरे हिंदुत्व आमचे. या चढाओढीत आणि बदलेल्या राजकीय समीकरणामुळे कार्यकर्तेही सैरभैर झाले आहेत.

एकेकाळी कट्टर शिवसैनिक असलेल्या एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षप्रमुखांना मुख्यमंत्रीपदावरुन खाली खेचत त्यांच्याकडून सत्ता हिसकावून घेतली. शिवसेनेतून तब्बल ४० आमदारांसोबत बाहेर पडत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला होता.

उद्धव ठाकरे तसेच शिवसेना नेत्यांकडून एकनाथ शिंदे तसेच बंडखोर आमदारांचा वारंवार गद्दार, असा उल्लेख केला जात आहे. तरी आश्चर्य म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या घरात अजूनही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो आहे. त्यामुळे बंडखोरीनंतरही एकनाथ शिंदेंच्या मनात ठाकरेप्रेम कायम आहे का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.


हेही वाचा – बंडखोरांवर कारवाई, तर निष्ठावंताचे शिवसेनेकडून कौतुक

First Published on: July 11, 2022 10:23 AM
Exit mobile version