“अडचणींच्या काळात माझ्याकडे आणि … “; राज ठाकरेंचा शेतकऱ्यांना सवाल

“अडचणींच्या काळात माझ्याकडे आणि … “; राज ठाकरेंचा शेतकऱ्यांना सवाल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आज नाशिकमधल्या काही शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेतली आणि आपल्या अडचणी सांगितल्या. त्यावेळी अडचणीच्या काळात तुम्ही मला भेटायचा येता आणि मतदान पिळवणूक करणाऱ्यांना का करता? असा थेट प्रश्न राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना विचारला आहे. तसंच शेतकरी प्रतिनिधींसह आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊ, असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. मात्र, शेतकऱ्यांना उद्देशून त्यांनी केलेलं हे वक्तव्य आता चांगलच चर्चेत आलं आहे. ( MNS President Raj Thackeray’s direct question to the farmers in election whom you Vote )

निवडणुकीच्या वेळी कोणाला मतदान करता?

निवडणुकीच्या काळात पैसे घेऊन बाकी सगळ्या गोष्टी घेऊन कोणाला मतदान करता? मग पाच वर्षे त्यांच्य नावाने टाहो फोडता आणि परत निवडणउका आल्यावर त्यांनाच मतदान करता. मग कशासाठी हा खेळ खेळतो आहोत? मी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटतो. मात्र, काय करतो आहोत त्याचं भान ठेवा. कारण, तुम्ही मतदान त्यांना करता त्यामुळे त्यांना वाटतं की हे मतदान आपल्यालाच करणार आहेत. त्यांना काही फरक पडत नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना खडे बोल सुनावले.

आज आमच्यासह अनेक शेतकऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरे यांनी आम्हाला मदतीचं आश्वासन दिलं. राज ठाकरे म्हणाले की, तुमच्या जमिनींचे जे प्रश्न आहेत त्याबाबत मी मुख्यमंत्र्यांनी तुमचे बोलणं करुन देतो. तुम्हाला न्याय मिळेल यासाठी प्रयत्न करतो. त्यामुळे आम्ही आज समाधानी आहोत. ठाकरेंनी आमच्या जमिनीबाबतच्या समस्या जाणून घेतल्याचं शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी सांगितलं. आमच्या जमिनींचे बँकेकडून लिलाव केले जात आहेत. त्या सगळ्या गोष्टी आम्ही सांगितल्या आहेत. त्यांनी आम्हाला मदतीचं आश्वासन दिलं आहे.

( हेही वाचा: आम्ही धरसोड करत नाही; आशिष शेलारांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल )

यापूर्वीही बैठक

यापूर्वी देखील राज ठाकरे आणि शेतकऱ्यांची एक बैठक झाली आहे. त्यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीवेळी राज ठाकरे यांच्यासोबत शेतकरीदेखील उपस्थित होते.

First Published on: May 21, 2023 3:53 PM
Exit mobile version