घरमहाराष्ट्रआम्ही धरसोड करत नाही; आशिष शेलारांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

आम्ही धरसोड करत नाही; आशिष शेलारांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

Subscribe

नोटबंदीच्या निर्णयातील धरसोडपणा देशाला परवडणारा नाही, असं राज ठाकरे म्हणाले आता त्याला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर देत ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकतीच 2000 रुपयांची नोट चलनातून रद्द करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयावर आता अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. राज ठाकरे यांनी या निर्णयानंतर मोदी सरकारवर टीका केली होती. नोटबंदीच्या निर्णयातील धरसोडपणा देशाला परवडणारा नाही, असं राज ठाकरे म्हणाले आता त्याला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर देत ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.( Maharashtra Politics We dont boycott Ashish Shelar attacked on Raj Thackeray )

नेमकं काय म्हणाले शेलार?

शेलार यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज ठाकेर यांना आमचं निवेदन आहे की तुम्ही उत्तम नेते आहात, अभ्यास करता पण सर्व विषयांवर बोललं पाहिजे असं नाही. तुम्ही व्यक्तिगत माझ्यावर बोलाल तर ठीक आहे, पण तुम्ही आमच्या सर्वोच्च नेत्यांवर बोलाल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. आम्ही धरसोड करणारे नाहीत, मोदीजी जे करतात ते प्रामाणिकपणे करतात, असं म्हणत आशिष शेलार यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

- Advertisement -

राज ठाकरे काय म्हणाले होते?

राज ठाकरे म्हणाले की, नोटबंदी झाली त्याचवेळी एक भाषण केलं होतं. हा धरसोड करण्याचा प्रकार आहे. तज्ज्ञांना विचारुन या गोष्टी झाल्या असत्या, तर ही वेळ आली नसती. कधी एखादी गोष्ट आणायची, कधी बंद करायची. त्यावेळी नोटा आणल्या, तर एटीएममध्येही जात नव्हत्या. म्हणजे नोटा आणताना त्या मशीनमध्ये जातात की नाही हेही पाहिले नव्हते. हे असले निर्णय देशाला परवडणारे नसतात. आता पुन्हा लोकांनी बँकेत पैसे टाकायचे. पुन्हा हे नव्या नोटा आणणार. हे असं सरकार चालत नाही. असे प्रयोग केले जात नाहीत, असे राज ठाकरे यांनी म्हटलं.

( हेही वाचा: 2024 नव्हे, तर ‘या’ महिन्यात होणार लोकसभा निवडणुका; प्रकाश आंबेडकरांचा दावा )

- Advertisement -

कर्नाटक निकालावर राज ठाकरे काय म्हणाले?

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन लगेच काही निष्कर्ष काढता येणार नाही. एका राज्यावर देशभरातील गोष्टींचा आराखडा मांडू शकत नाही. आगामी काळात गोष्टी कशा बदलत जातात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -