‘राम मंदिर नंतर बांधा, आधी पत्री पूल बांधा’

‘राम मंदिर नंतर बांधा, आधी पत्री पूल बांधा’

'राम मंदिर नंतर बांधा, आधी पत्री पूल बांधा'

कल्याणचा जुना पत्री पूल नूतनीकरणाच्या निमित्ताने गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. तो पूल पाडून तिथे नवा पूल उभारण्यात येणार आहे. परंतु, अध्यापही त्यापूलाचे पाडकाम करण्यात आलेले नाही. बंद करण्यात आलेल्या या पूलामुळे वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत आहे. त्यामुळे मनसेने शनिवारी त्याच पूलावर बसून प्रशासनाच्या विरोधात ठिय्या आंदोलन केले. यावेळी ‘राम मंदिर नंतर बांधा, आधी पत्री पूल बांधा’ अशी टीका मनसेने केली. या आंदोलनात मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

काळे कपडे घालून मनसेने निषेध दर्शवला

मनसेच्या कार्यकर्त्यांनी काळे कपडे घालून प्रशासनाच्या धिम्या कारभाराचा निषेध केला. या आंदोलनात मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकार, पालकमंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार, महापालिका यांच्या विरोधात मोठमोठ्यात घोषणाबाजी केली. त्याचबरोबर आंदोलनानंतरही कामाला गती मिळाली नाही तर यापुढचं आंदोलन उग्र स्वरुपाचं असेल, असा इशाराही त्यांनी दिला.

हेही वाचा – मनसेने हातावर लिहिलंय ‘मेरा चौकीदार चोर है’

एकाच पूलावर दूहेरी वाहतूक सुरु

पत्री पूलाला शंभरहून अधिक वर्षे झाले असून तो जीर्ण झाला होता. अंधेरी येथे पादचारी पूल पडल्यानंतर राज्य सरकारने सर्व जुन्या पुलांची पाहणी करुन त्यांचे नूतनीकरण करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पत्री पूलाचे नूतनीकरण करण्याचे काम सुरु करण्यात आले. यासाठी सप्टेंबरच्या अखेरपासून या पूलाला पाडायला सुरुवात झाली होती. हा पूल दीड महिन्यात पाडून त्याजागी पुढच्या तीन महिन्यात नवीन पूल उभारण्याचं आश्वासन एमएसआरडीसीने दिलं होतं. परंतु, दीड महिना झाला असूनही हा पूल पाडण्यात आलेला नाही. या पूलाचं काम अतिशय संथगतीने सुरु आहे. दरम्यान, या पूलावरुन धावणाऱ्या गाड्यांची वाहतून बाजूच्या पूलाकडे वळवण्यात आली आहे. त्यामुळे बाजूच्या पूलावर दुहेरी वाहतूक सुरु असून याठीकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.


हेही वाचा – भारत बंद आंदोलनात मनसेचा वरचष्मा

First Published on: November 3, 2018 4:45 PM
Exit mobile version