भारत बंद आंदोलनात मनसेचा वरचष्मा

महागाई विरोधात मुंबईसह देशभरात काँग्रेसने पुकारलेल्या बंधमध्ये काँग्रेसपेक्षाही जास्त झळकतेय ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना. राज ठाकरेंच्या मनसेने आपल्या आक्रमक आंदोलनामुळे आजचा भारत बंद चांगलाच गाजवला आहे.

MNS aandolan
मनसेच आंदोलन

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात मुंबईसह देशभरात विरोधी सरकारमधील सर्व पक्षांनी एकत्र येऊन भारत बंदची हाक दिली. काँग्रेसने या बंधचे नेतृत्त्व केले असले तरी काँग्रेससोबत राष्ट्रवादी,मनसे,शेकाप,स्वाभिमानी शेतकरी संघटना अशा बऱ्याच विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला खरा मात्र या सर्वांत जास्त भाव खाउन गेली ती राज ठाकरेंची मनसे. मुंबई, उपनगरांसह नवी मुंबईत मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलनात चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला. ज्यामुळे सर्वत्र मनसेचा गाजावाजा पाहायला मिळाला.

असं केला मनसेन आंदोलन

मनसे कार्यकर्त्यांनी उपनगरात अंधेरी डी.एन.नगर स्थानकात मेट्रो ट्रेनची दोन्हीबाजूची वाहतूक अडवत मेट्रो ट्रेन रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पोलिसांनी मनसे अंधेरी कार्यकर्त्यांची धरपकड केली. आंदोलनाचा पारा चढत असताना गोरेगाव दिंडोशी येथे मनसैनिकांनी भाजपच कार्यालय फोडून आपला राग व्यक्त केला. तसेच सिद्धीविनायक मंदिराजवळ मुख्यमंत्री दर्शनाला आले असताना मनसैनिकांनी मुख्यमंत्र्याची गाडी आडवत काळे झेंडें देखील दाखवले. तसेच मनसेने चेंबूर येते गाढवावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी याचं पोस्टर लावून मिरवणूक काढली. याचवेळी दादरच्या मनसैनिकानीं मोदींच्या पुतळयाची अंत्ययात्रा देखील काढली.अंत्ययात्रेसाठी आणलेला पुतळा ताब्यात घेण्यावरून पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांत हातपायी देखील झाली. अशाप्रकारे आक्रमक आंदोलन आज सर्वत्रच मनसेकडून पाहायला मिळाल. याचेच परिणाम म्हणून मनसे कार्यकर्त्यांना पोलीसानी ताब्यात घेतला. मनसे सरचिटणीस नितीन सरदेसाई, रिटा गुप्ता, स्नेहल जाधव, संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार यांना ताब्यात घेत शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करुन सोडण्यात आले.

 

शिवसेनेनं घेतली माघार

महागाईविरोधात काँग्रसने पुकरलेल्या बंदात बऱ्याच पक्षांनी सहभाग घेतला असता शिवसेनेन मात्र माघार घेतली. अमित शहांचा फोन आला आणि शिवसेनेनं माघार घेतल्याची टीका होत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी असा कोणाचा ही फोन आला नाही. शिवसेना पक्ष मी चालवतो असं सांगत आजच्या बंद बद्दल कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. तसेच जनता आणि महाराष्ट्राचे हीत हेच शिवसेनेसाठी सर्वोच्च असते असे स्पष्टीकरण शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिले आहे. तसेच पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन ‘सामना’तून सरकारवर टीकास्त्र देखील सोडण्यात आलं आहे.

shivsena photo
प्रातिनिधीक फोटो