अखेर शिक्कामोर्तब …’मनसे’ करणार काँग्रेस – राष्ट्रवादीचा प्रचार

अखेर शिक्कामोर्तब …’मनसे’ करणार काँग्रेस – राष्ट्रवादीचा प्रचार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) लोकसभा निवडणमुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करणार या निर्णयावर अखेर आज शिक्कामोर्तब झाला आहे. राजगडावर झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आज राजगडावर मनसे विभाग अध्यक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत बाळा नांदगावकर यांनी या संदर्भातल्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. मनसेन उघडपणे शिवसेना आणि भाजपा विरोधात बिनधास्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करावा, असे नांदगावकर यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे.

आपली लढाई मोदींविरोधात

मनसेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी झालेल्या भाषणात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ‘आपली लढाई मोदींविरोधात आहे. शाह आणि मोदी यांना हटवण्यासाठी पक्ष कोणता ते पाहणार नाही. जे पक्ष मोदींचा विरोध करत आहेत त्यांना साथ देणार’, असे राज ठाकरेंनी स्पष्ट केले होते. त्यानुसार आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्याचा मनसेने निर्णय घेतला आहे.


वाचा – गांधीनगरात खानाचा शामियाना! धम्माल ट्रोलिंग व्हिडिओ व्हायरल!


मोदी मुक्त भारत हेच माझ धोरण

मोदी मुक्त हेच माझ आणि माझ्या पक्षाचे धोरण असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र आलंच पाहिजे हे गेल्या वर्षी बोललो होतो. आता जे पक्ष मोदींच्या विरोधात एकत्र आले आहेत तेच पक्ष माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. जे काही करायचं आहे ते भाजपाच्या विरोधात करायचे आहे. तसेच राज ठाकरेंनी भाषणाच्या वेळी एअर स्ट्राईकबाबत धंद्यात खोटी माहिती पसरवली जाते. खोट्या फोटोंच्या आधारे प्रचाराला भूल नको. तसेच मोदी हे अत्यंत खोटारडे असून त्यांच्यावर मुळीच विश्वास ठेवू नका असेही राज ठाकरे त्यांच्या भाषणात म्हणाले होते.


गांधीनगरात खानाचा शामियाना! धम्माल ट्रोलिंग व्हिडिओ व्हायरल!

First Published on: March 30, 2019 9:34 PM
Exit mobile version