मोदी भाबडे, निरागस, निष्पाप; शिवसेनेची पंतप्रधानांवर उपहासात्मक टीका

मोदी भाबडे, निरागस, निष्पाप; शिवसेनेची पंतप्रधानांवर उपहासात्मक टीका

मुंबई – नितीश कुमारांचे नेतृत्व उत्तरेत वरचढ ठरू शकेल व त्याचा फटका भाजपला बसेल असा लोकांचा अंदाज आहे. मोदी यांनी एऐक वार केला की नितीश लगेच पलटवार करून उत्तर देतात. त्यावरप भक्तांची तोंडे बंद होतात. पंतप्रधान मोदी यांनी आता जे राजकीय गटाचे टुमणे सुरू केले पण तो वार त्यांच्यावरच उलटला आहे. भ्राष्टाचाऱ्यांवरील कारवाईतून नवा राजकीय गट उदयास येत आहे, हे त्यांचे म्हणणे खरे मानले तर महाराष्ट्रातील भाजपच्या मांडीवर बसलेला शिंदे गट हेच त्याचे उत्तर आहे. मोदी भाबडे आहेत. निरागस आहेत. निष्पाप आहेत. त्यांना कोणीतरी सत्य माहिती द्यायला हवी, अशी उपहासात्मक टीका शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून करण्यात आली आहे.

हेही वाचा – युतीच्या मतदारांसोबत धोका – एकनाथ शिंदे

नितीश, शरद पवार, ममता व आम्ही म्हणजे शिवसेना, तेलंगणाचे के.सी राव वगैरे एकत्र येत आहेत ते भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यासाठी ही भ्रष्टाराच्या समर्थनार्थ राजकीय गटबाजी आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्यावर सामनाच्या अग्रलेखातून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

ममता बॅनर्जी यांना आव्हान देण्यास भारतीय जनता पक्षाने तृणमुलचेच सुवेंदू अधिकारी यांना भाजपात आणले. आता ते भाजपकडून विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. मोदी यांच्या मनात सुवेंदंना पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रींच करायचे होते. पण लोकांनी ते होऊ दिले नाही. हे सुवेंदु कोण? हे सुवेंदु म्हणजे शारदा चीट फंड घोटाळ्यातील मास्टर माईंड आहेत व त्यांचा जागा तुरुंगात आहे. अशी गर्जना कालपर्यंत भाजप करीत होता. हे निरागस मोदींना कोणी माहीत करून दिले नाही काय? असा सवाल यातून करण्यात आला आहे.

हेही वाचा – मुंबई महापालिकेचे आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार रखडले; शिक्षक दिन पुरस्काराविना

महाराष्ट्रात तर भ्रष्ट मंडळींना बाजूला घेऊन त्यांनी एक गट केला. स्वतः शिंदे व त्यांच्या लोकावंर ईडी चौकशीचे जोखड होतेच. त्यांच्या बरोबरच्या किमान दहा आमदारांची ईडी चौकशी सुरू होती. म्हणजे भ्रष्टाचार होताच. काहींनी अटकपूर्व जामीन घेतले. या सगळ्यांचा एक राजकीय गट करून त्यांच्याबरोबर भाजपाने महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. पुन्हा आश्चर्य असे की या गटाचे आमदार सांगतात आम्ही भ्रष्ट असलो तरी न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने लागले. निरागस मोदी यांनी या सर्व प्रकरणाचा अभ्यास केला पाहिजे, असंही या अग्रलेखात म्हटलं आहे.

First Published on: September 6, 2022 8:19 AM
Exit mobile version