घरमुंबईमुंबई महापालिकेचे आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार रखडले; शिक्षक दिन पुरस्काराविना

मुंबई महापालिकेचे आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार रखडले; शिक्षक दिन पुरस्काराविना

Subscribe

मुंबई – भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली डॉ. राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने मुंबई महापालिका दरवर्षी पालिका व खासगी शाळांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ५० शिक्षकांची आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारासाठी निवड करून त्यांचा विशेष कार्यक्रमात सन्मान करते. मात्र यंदा पालिकेची निवडणूक मुदत ७ मार्च रोजीच संपली. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया रखडली. पालिकेत सत्ताधारी कोणीच नाहीत. प्रशासनाच्या हातात संपूर्ण निर्णय प्रक्रिया असतानाही ५ सप्टेंबरपर्यंत ना आदर्श शिक्षक निवडले ना त्यांची यादी जाहीर झाली व ना पुरस्कार लाभले. जणू पालिकेलाच शिक्षक दिन व आदर्श शिक्षक निवडीचा विसर पडला की काय,अशी पालिका वर्तुळात चर्चा सुरू आहे.

हेही वाचा – कोण आदित्य ठाकरे?, 32 वर्षांचा पोरगा आमच्यावर टीका करतोय; गुलाबराव पाटलांचा हल्लाबोल

- Advertisement -

दरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ‘ शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्याची पालिकेत परंपरा आहे. त्यानिमित्ताने पालिका शिक्षण विभाग व आर्दश शिक्षक महापौर पुरस्कारासाठी शिक्षण समितीच्या माध्यमातून ५० शिक्षकांची निवड करते. मात्र यंदा ७ मार्च रोजी पालिकेची मुदत संपली. त्यामुळे पालिकेत पुन्हा निवडणूक होऊन सत्ताधारी पक्ष, महापौर, उप महापौर, सभागृह नेते, विविध समिती अध्यक्ष यांची निवड होणे अपेक्षित होते. मात्र राजकीय तिढा, घाणेरडे राजकारण, प्रशासनाची अक्षम्य उदासीनता आदी कारणांमुळे हे सर्व काही वेळेत घडू शकले नाही. परिणामी सोमवारी शिक्षक दिन उजाडला व दिवस मावळला तरी आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारासाठी वर्षभरात उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या ५० शिक्षकांची यादी प्रशासनाला तयार करता आली नाही. त्यामुळे शिक्षक वर्गाकडून प्रशासनाच्या उदासीनतेवर टीकेची झोड उठविण्यात येत आहे.

हेही वाचा आमच्यासोबत आहे तीच खरी शिवसेना, मुंबई दौऱ्यात अमित शाहांचा झंझावात

- Advertisement -

पालिका शिक्षण विभागाचे अधिकारी आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारासाठी शिक्षण समितीच्या माध्यमातून ५० शिक्षकांची निवड करण्यात येते. मात्र यंदा शिक्षण समिती अस्तित्वात नसल्याने प्रशासकीय अधिकारात निर्णय घेण्यास वेळ लागला आहे, अशी कारणे देत आहेत. त्यामुळे आता या आदर्श शिक्षकांची निवड नेमकी कधी व कशी होणार, त्यासाठी आणखीन किती कालावधी लागणार याकडे पालिका व खासगी शाळांमधील शिक्षकांच्या नजरा लागल्या आहेत.

आर्दश शिक्षक महापौर पुरस्कारासाठी शिक्षण समितीच्या माध्यमातून ५० शिक्षकांची निवड करण्यात येते. मात्र यंदा शिक्षण समिती अस्तित्वात नसल्याने प्रशासकीय अधिकारात निर्णय घेण्यास वेळ लागला आहे. परंतु पुढील ८ ते १० दिवसांत ५० आर्दश शिक्षक महापौर पुरस्काराने गौरव करण्यात येईल.

अजित कुंभार, सह आयुक्त शिक्षण विभाग, मुंबई महापालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -