देशमुखांसह नवाब मलिकांची नव्या वर्षाची सुरुवात तुरुंगात, मोहित भारतीय यांचे वक्तव्य

देशमुखांसह नवाब मलिकांची नव्या वर्षाची सुरुवात तुरुंगात, मोहित भारतीय यांचे वक्तव्य

मोहित भारतीय मानहानी प्रकरण: नवाब मलिकांचा १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या नव्या वर्षाची सुरुवात तुरुंगात होणार असल्याचे खोचक ट्विट मोहित भारतीय यांनी केलं आहे. नवाब मलिक आणि मोहित भारतीय यांच्यामध्ये कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. मोहित भारतीय एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या प्रायव्हेट आर्मीचे सदस्य असून भारतीय हेच या प्रकरणाचे मास्टरमाईंड आहेत असा आरोपही नवाब मलिक यांनी केला होता. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात मोहित भारतीय यांच्या मेव्हण्याला सोडण्यात आले असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला होता. यानंतर मोहित भारतीय यांची या प्रकरणात एन्ट्री झाली.

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांच्या गाण्याला ड्रग्ज पेडलरने फायनान्स केले होते. यावरुन मलिकांनी फडणीसांवर निशाणा साधला होता. तसेच तत्कालीन फडणवीस सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या मार्गदर्शनाने ड्रग्ज विक्री होत होती असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. यावर फडणवीसांनी प्रत्युत्तर देताना बॉम्ब फोडणार असल्याचे वक्तव्य केले होते. यालाच नवाब मलिकांनी आपण तयार आहोत असे म्हणत ट्विट केलं होते. मलिकांच्या याच ट्विटला उद्देशून मोहित भारतीय यांनी मलिकांवर निशाणा साधला आहे.

मोहित भारतीय यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, अनिल देशमुख आणि नवाब मलिक तुम्ही नवीन वर्षाची सुरुवात सोबतीने तुरुंगात कराल. २०२२ या वर्षासाठी तुम्ही एक जेवणाचा डब्बा मागवून ठेवा असा खोचक निशाणा मोहित भारतीय यांनी साधला आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काय खुलासा करणार आणि कोणता बॉम्ब फोडणार याकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे.

देवेंद्र फडणवीसांनी दिला होता धमाक्याचा इशारा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नवाब मलिकांनी ड्रग्ज व्यवसायात सहभाग आणि वसुलीचे आरोप केले होते. फडणवीस नीरज गुंडेच्या माध्यमातून सर्व वसुली करत होते आसा आरोप नवाब मलिकांनी केला होता. यावरुन फडणवीसांना इशारा दिला होता की, नवाब मलिक यांनी ऐन दिवाळीत लवंगी फटाका लावला आता मी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असा इशारा फडणवीस यांनी दिला होता. यावर नवाब मलिकांनी है तयार हम असे ट्विट केले होते.


हेही वाचा : drug case: नवाब मलिकांच्या जावयाशी संबंधित दोघांना समन्स, एनसीबी SIT टीम करणार चौकशी

First Published on: November 9, 2021 10:25 AM
Exit mobile version