Monsoon update : राज्यात अतिमुसळधार पावसाचा Orange Alert !

Monsoon update : राज्यात अतिमुसळधार पावसाचा Orange Alert !

संपुर्ण महाराष्ट्रात येत्या चार दिवसात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात ६ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर या कालावधीत मुसळधार पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने वर्तवला आहे. या मुसळधार पावसासाठीचे कारण म्हणजे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा क्षेत्र निर्माण झाल्याने संपुर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Monsoon Orange alert for maharashtra for upcoming couple of days)

हा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने याचा प्रभाव हा महाराष्ट्राच्या दिशेने असणार आहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणावर टप्प्याटप्प्याने याचा परिणाम असणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मराठवाडा ते मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने मांडला आहे. तर कोकणातही या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम असणार आहे. उत्तर कोकणाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आगामी दोन दिवसांच्या कालावधीसाठी हा ऑरेंज अलर्ट असणार आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याचा परिणाम हा कोकणात सर्वाधिक असणार आहे. कोकणात विशेषतः उत्तर कोकणात या पावसाचा परिणाम असणार आहे. ठाणे, पालघर, रायगड आणि मुंबई याठिकाणी पावसाचा अधिक परिणाम असेल. काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी आगामी दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर ९ सप्टेंबरपासून यलो अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद याठिकाणीही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आले.


हे ही वाचा – ट्विटरचे नवे फिचर : फक्त बोलून करता येणार ‘ट्विट’


 

First Published on: September 6, 2021 3:37 PM
Exit mobile version