कोकणात मान्सून पूर्व पाऊस; वीज, टेलिफोन सेवा खंडित

कोकणात मान्सून पूर्व पाऊस; वीज, टेलिफोन सेवा खंडित

कोकणात मान्सून दाखल

मान्सून पूर्व पावसाचे आज कोकणात आगमन झाले आहे. आज कोकणाची पहाट ही मुसळधार पावसाने झाली असली तरी देकील हा मान्सून पूर्व पाऊस आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आज वादळी वाऱ्यासह मान्सून पावसाने हजेरी लावल्यने उकाड्याने हैराण झालेल्या कोकणवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, कोकणात आगमन झालेल्या पावसाचा जोर अधिक असल्यामुळे त्याचा फटका देखील काही भागात बसला आहे. अवकाळी पावसाचा जोर अधिक असल्याने अनेक ठिकाणची वीज आणि टेलिफोन सेवा देखील खंडित झाली आहे.

वादळी वाऱ्यासह पाऊस

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ढगांच्या गडगडाटासह मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली असून बळीराजा सुखावला आहे. मात्र, काही भागात पावसाचा जोर अधिक असल्यामुळे बऱ्याच ठिकाणची वीज आणि टेलिफोन सेवा खंडित झाली आहे. दरम्यान, येत्या २४ तासांत महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये वादळीवाऱ्यासह पाऊस हजेरी लावणार आहे. विदर्भमराठवाड्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तसेच केरळात ८ जून रोजी मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार येत्या २ दिवसांत केरळात मान्सूनचे आगम होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – लासलगावी तासभर बरसला वळीवाचा पाऊस

हेही वाचा – कृत्रिम पाऊस पाडण्याचे असे आहेत दुष्परिणाम


 

First Published on: June 6, 2019 2:41 PM
Exit mobile version