घरमहाराष्ट्रकृत्रिम पाऊस पाडण्याचे असे आहेत दुष्परिणाम

कृत्रिम पाऊस पाडण्याचे असे आहेत दुष्परिणाम

Subscribe

कृत्रिम पाऊस पाडण्याचे अनेक दुष्परिणाम असून त्यामुळे शेती आणि मातीचे नुकसान होण्यासोबतच नैसर्गिक ढग विरण्याचीही शक्यता असते. हे लक्षात घेऊन ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत या प्रयोगांवर बंदी आहे. चीनमध्ये या प्रकारचे प्रयोग यशस्वी असले तरी त्याचा ‘फॉर्म्युला’ चीनने कुणाला दिलेला नाही. तसेच ते जमिनीवरून ढगांवर अग्निबाणांचा बारा करतात. मात्र आपल्याकडे विमानद्वारे ढगांवर अग्निबाणांचा मारा केला जातो. हे हवामानाच्या दृ्ष्टीने घातक असल्याची भीती हवामान आणि पर्यावरण तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

हवामान अभ्यासक किरणकुमार जोहरे म्हणाले की, ‘ढगांची चोरी अथवा कृत्रिम पावसाच्या प्रयोगात ढग खर्ची पडल्याने पुढील भागात ढग जात नाहीत आणि त्यामुळे पुढील प्रदेशात पाऊस न झाल्याने पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होऊ शकते. इतकेच नव्हे तर ढगामध्ये फवारणी करण्यात येणारे रसायन प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात फवारले गेले तर असलेले ढग देखील विरून जाऊन नष्ट होतात आणि नैसर्गिक होणार पाऊस देखील मग होत नाही.

- Advertisement -

याशिवाय कृत्रिम पावसाच्या प्रयोगात वापरले जाणार सिल्वर आयोडाइड हे रसायन विषारी असल्याने पर्यावरण आणि सस्तन प्राण्यांसाठी घातक आहे. शेत जमिनीतील मातीत मिसळल्यामुळे मृदा प्रदूषण होऊन पिकांसाठी देखील घातक ठरते. सिल्वर आयोडाइड हे विषारी असल्यामुळे पर्यावरणाला हानी पोहचते. या कारणास्तव ऑस्ट्रेलियामध्ये कृत्रिम पावसाच्या प्रयोगावर बंदी आहे.

विमानाच्या प्रयोगाबद्दल ते म्हणाले की विमानाने कृत्रिम पाऊस पडण्याचा प्रयोग मान्सून पूर्व आणि मान्सूनोत्तर काळात करणे अतिशय धोकादायक आहे. वातावरणात असणारी अस्थिरताआणि हवेचा ऊर्ध्व झोत यामुळे विमान अपघात होण्याची शक्यता असते. तसेच योग्य ठिकाणी बीजारोपण न झाल्याने प्रयोग वाया जाण्याचीच शक्यता जास्त असते. कृत्रिम पावसाच्या प्रयोगात रासायनिक फवारणी जास्त झाल्यास ढग नष्ट होतात आणि पाऊस देखील पडत नाही. परिणामी सर्व प्रयोग वाया जातो. तसेच हे ढग नसत झाल्याने वाऱ्यांच्या दिशेने पुढच्या प्रदेशासाठी देखील ते उपलब्ध होत नाही परिणामी एक प्रकारे या प्रदेशातील ढगांची चोरीच घडते.

- Advertisement -

दरम्यान हवामान खात्याने यंदाच्या पावसाचा दिलेला अंदाज आणि मराठवाडा आणि विदर्भातील सध्याची आणि संभाव्य दुष्काळाची स्थिती लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने मंत्रीमंडळात ३० कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी दिली. विमानाद्वारे हा कृत्रिम पाऊस (Aerial Cloud Seeding) पाडला जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -