राज्यभरात १० हजारांहून अधिक गोवर संशयित रुग्ण, सक्तीने लसीकरणाचे आदेश

राज्यभरात १० हजारांहून अधिक गोवर संशयित रुग्ण, सक्तीने लसीकरणाचे आदेश

मुंबई – मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात सापडणारे गोवर रुग्ण (Measles) आता संपूर्ण महाराष्ट्रात आढळून येत आहेत. आतापर्यंत राज्यभरात १० हजार २३४ संशयित रुग्ण (Suspected Measles Patients) सापडले असून यापैकी निश्चित झालेल्या रुग्णांची संख्या ६५८ आहे. तर, आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये ९ जण गोवरसंशयित होते. तर, निश्चित गोवरबाधित असलेल्या रुग्णांच्या मृतांची संख्या चार आहे.

हेही वाचा आता मुंबईत सायकलवरून मारा फेरफटका, आदित्य ठाकरेंच्या प्रस्तावाला पालिकेची परवानगी

आंतरविभागीय समन्वयाने राज्यात गोवर प्रतिबंध करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या बैठकीत घेण्यात आला. संशियत रुग्णांना सोडण्यासाठी खासगी क्षेत्र, आयएमए आणि आयपीसारख्या संस्थाची मदत घेण्यात येणार आहे.

हेही वाचा – कामाख्या देवी न्यायाचीही देवता, ४० आमदारांचा न्याय करेल; संजय राऊतांची टीका

महत्त्वाचे म्हणजे, यापैकी एका बालकाने गोवर लस घेतला होता. इतरांनी एकही लस घेतली नव्हती. ज्या भागात गोवरचा उद्रेक झाला आहे, तेथे सक्तीने लसीकरण करण्यात येत आहे. तर, नऊ महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बालकांमध्ये गोवर बाधित रुग्ण १० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने तेथे सहा ते नऊ महिन्यांच्या बालकांना एमआर लसीचा एक अतिरिक्त डोस देण्यात येत आहे.

First Published on: November 27, 2022 11:29 AM
Exit mobile version