Corona: लाखांहून अधिक बाधितांमध्ये कोरोनाची लक्षणेच नाहीत!

Corona: लाखांहून अधिक बाधितांमध्ये कोरोनाची लक्षणेच नाहीत!

कोरोना व्हायरस

राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव सातत्याने वाढत आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा देशात सर्वाधिक ६ लाखांहून अधिक आहे. पण यापैकी राज्यातील लाखांहून अधिक रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणेच नसल्याचे समोर येत आहे. सध्या शहरातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत असला तरी ग्रामीण भागामध्ये तो अजूनही आटोक्यात आलेला नाही. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये असे दिसून आले आहे की, कोरोनाची लक्षणे नसलेल्या, सौम्य लक्षणे असलेल्या आणि कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ९६ टक्के इतके आहे. तर गंभीर रुग्णांची संख्या ४ हजार ३६७ असून याचे प्रमाण ३ टक्के इतके आहे. यामध्ये आयसीयूबाहेर आणि ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांचे प्रमाण १ टक्के आहे.

कोरोनाची लक्षण नसलेले, सौम्य लक्षणांसह रिकव्हर होण्याच्या वाटेवर असलेले रुग्ण राज्यात १ लाख ४८ हजार ८०५ आहेत. यामुळे दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाची लागण झाली तरी तो नियंत्रणात येऊ शकतो. राज्यात आयसीयुतून बाहेर आलेल्या रुग्णांचा आकडा २ हजार ८९ इतका आहे. सध्या गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या आणि कोरोनाची लागण होऊन सुद्धा लक्षणे दिसत नसलेल्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे अशा रुग्णांच्या घरी सर्व सुविधा असल्यास घरीच क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात येतो.


हेही वाचा – Corona Update: राज्यात आज १३,१६५ नवे रूग्ण; ३४६ जणांचा मृत्यू


 

First Published on: August 20, 2020 8:53 AM
Exit mobile version