निवडणूक आयोगानं बाजार मांडून ठेवलाय, खासदार अरविंद सावंत यांचा हल्लाबोल

निवडणूक आयोगानं बाजार मांडून ठेवलाय, खासदार अरविंद सावंत यांचा हल्लाबोल

केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेनेचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ठाकरे गटाकडून आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु आता सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्थगिती देण्यास नकार दिल्यामुळं ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे.

खासदार अरविंद सावंत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, सुप्रीम कोर्टात आज राज्यातील सत्तासंघर्षावर ज्या प्रमाणे सुनावणी झाली, त्यावरून आम्हाला न्याय मिळेल असं वाटत होतं. परंतु शिवसेनेचं नाव आणि चिन्ह ज्या प्रकारे शिंदे गटाला दिलं ते पाहता निवडणूक आयोगाचे प्रमुख विकले गेले आहेत, असा आरोप अरविंद सावंत यांनी केला.

निवडणूक आयोगानं बाजार मांडून ठेवला आहे. आमच्या बाजूनं निकाल दिल्यास तुम्हाला राज्यपाल केलं जाईल, असं सध्या निवडणूक आयोगामध्ये सुरू असल्याचाही गंभीर आरोपही अरविंद सावंत यांनी केला आहे.

मी जेव्हा निवडणूक आयोगाच्या निकालाकडे पाहतो तेव्हा मला घटनाक्रम लक्षात येतो. शेड्युल दहा याची सांगड घातली तर अज्ञानी व्यक्तीही सांगेल की निकाल काय यायला हवा, संविधानाला डावलून निर्णय घेतले जात असतील तर अवघड आहे, असंही अरविंद सावंत म्हणाले.


हेही वाचा : उद्धव ठाकरे खेडमध्ये जाहीर सभा घेणार, मातोश्रीवर शिवसैनिकांनी घेतली भेट


 

First Published on: February 22, 2023 9:57 PM
Exit mobile version