अयोध्येत ठाकरे कुटुंबीयांना नाही, केवळ राज ठाकरेंनाच विरोध : बृजभूषण सिंह

अयोध्येत ठाकरे कुटुंबीयांना नाही, केवळ राज ठाकरेंनाच विरोध : बृजभूषण सिंह

संग्रहित छायाचित्र

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपण अयोध्या दौरा करणार असल्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना विरोध करत उत्तर भारतीय नागरिकांची माफी मागण्याची मागणी केली होती. परंतु, आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याचे त्याने स्वागत केले. यावेळी त्यांनी ठाकरे कुटुंबीयांपैकी कुणाच्याही अयोध्या दौऱ्याला आपला विरोध नाही फक्त राज ठाकरेंना विरोध असल्याचे म्हटले. (mp brijbhushan singh said only oppose to raj thackeray not to thackeray family in ayodhya)

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) येत्या १५ जून रोजी आयोध्या दौरा करणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज भाजपाचे उत्तरप्रदेशचे खासदार बृजभूषण सिंह (mp brijbhushan singh) यांनी आदित्य ठाकरेंच्या अयोध्या (ayodhya) दौऱ्याचे स्वागत केले आहे.

हेही वाचा – विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात बदल

बृजभूषण सिंह यांनी अयोध्येतल्या शरयू तीरावरच्या नया घाटावर बृजभूषण यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याबाबत भाष्य केले. यावेळी ते म्हणाले की, “महाराष्ट्रतील लोकांशी आमच्या उत्तर भारतीय, अयोध्या वासीयांचा कोणतेही शत्रुत्व नाही. आमचे शत्रुत्व हे फक्त राज ठाकरेंशी आहे. कारण त्यांनी उत्तर भारतीयांना अपमानित केले. त्यामुळे ठाकरे कुटुंबीयांपैकी कुणाच्याही अयोध्या दौऱ्याला आपला विरोध नाही. जर राज ठाकरे यांचे कुटुंब त्यांची आई, मुलगा कोणीही येऊ देत त्यांचे स्वागत आदरातिथ्य माझ्या घरी करेल पण राज ठाकरेंना विरोध कायम राहणार आहे”, असे ते म्हणाले.

“राज ठाकरे यांना मी फक्त माफी मागा आणि अयोध्येय या असे म्हटलं होते. परंतु, राज ठाकरेंनी अयोध्येचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे. त्यामुळे आम्हीहीण आमचा विरोधाचा कार्यक्रम पुढे ढकलला. त्यामुळे जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी नाही तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा बृजभूषण सिंह यांनी दिला.


हेही वाचा – दुसऱ्यांच्या कामावर जाऊन फोटोसेशन करायची मला सवय नाही, खासदार धनंजय महाडिकांचा मंडलिक यांना टोला

First Published on: June 13, 2022 10:36 PM
Exit mobile version