पुरामुळे औरंगाबादमध्ये मोठं नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करण्याची खासदार जलील यांची मागणी

पुरामुळे औरंगाबादमध्ये मोठं नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करण्याची खासदार जलील यांची मागणी

राज्यातील मराठावाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस झाला आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची हाताशी आलेली पीकं पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालं आहे. पुरामुळे औरंगाबादमध्ये अधिक पीकांचे नुकसान झाल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. खासदार जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पीकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी बांधव हताश झाले असून त्यांच्यामध्ये चिंतेच वातावरण पसरलं आहे.

एमआयएमचे नेते खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. औरंगाबादमध्ये गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. शेतकऱ्यांचे काढणीले आलेले पीक पुराच्या पाण्यात वाहून गेले असून शेतामध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी खासदार जलील यांनी केली आहे.

खासदार जलील यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलं आहे की, अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्याच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे. महाविकास आघाडीमधील नेत्यांनी नुकसाग्रस्त भागाची पाहणी करुन तात्काळ पंचनामे करुन येत्या ८ ते १० दिवसांत आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिलं होते. परंतु अद्याप शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थाना मदत मिळाली नाही. मदत मिळाली का? याची माहिती घेण्यासाठी प्रत्यक्ष दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली.

नैसर्गिक आपत्तीमुळे हाती आलेलं पीक पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. शेतकऱ्यांचे मूग, उडीद, मका, तुर, ऊस, भुईमुग पाण्याखाली गेलंय तर कपाशी आणि सोयाबीनच्या पिकांचे मोठे नुकसान झालं आहे. यामुळे शेतकरी बांधव आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांचे नुकसान भरुन न निघणारे आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.


हेही वाचा : बीडमधील जलसिंचन प्रकल्पांच्या क्षमतेत वाढ होणार, जयंत पाटील यांची ग्वाही


 

First Published on: September 29, 2021 1:45 PM
Exit mobile version