सर्वोच्च न्यायालयाने एकच हातोडा मारला आणि…, शिंद-फडणवीसांवर संजय राऊतांचा हल्लाबोल

सर्वोच्च न्यायालयाने एकच हातोडा मारला आणि…, शिंद-फडणवीसांवर संजय राऊतांचा हल्लाबोल

‘सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला नपुंसक म्हटले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून राज्यातील जनता या सरकारला नपुसक, बिनकामाचे असे म्हणत आहेत’, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. भडकाऊ भाषणे रोखण्याची शिंदे-फडणवीस सरकारमध्ये हिम्मत नाही. हे सरकार नपुंसक आहे, असे खडेबोल सर्वोच्च न्यायालयाने सुनावले आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. (MP Sanjay Raut Slams Maharashtra Government On Supreme Court Observation)

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुरूवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राऊतांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणावरून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधाला. “सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला नपुंसक म्हटले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून राज्यातील जनता या सरकारला नपुसक, बिनकामाचे असे म्हणत आहेत. आता यामागे तर आम्ही नाहीत. जर सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्र सरकारविषयी हे निरीक्षण आहे, तर यावरून सरकारची प्रत, प्रतिष्ठा काय आहे? हे सरकार सत्तेवर कशाप्रकारे आले? आणि काम करतेय हे सर्वोच्च न्यायालयाच्या एका वाक्यातून स्पष्ट झाले”, असे संजय राऊत म्हणाले.

“आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही राज्याच्या सरकारविषयी नपुंसक असा शब्द वापरला नव्हता. आम्ही नेहमी सांगतोय की हे सरकार अस्तित्वातच नाही. विशेषत: मुख्यमंत्री स्वत:ला गुलाम असल्याची रोज जाणीव करून देत आहेत. बसू का, खाऊ का, जेऊ का, उठू, डोळे मिटू का, डोळे उघडू का, बोलू का, वाचू का, यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सरकारवर हल्लाबोल केला. महाराष्ट्रात विविध मार्गानी जातीय आणि धार्मिक तणाव वाढावे, दंगली व्हाव्यात, अस्थिरता राहण्यासाठी हे सरकार राजकारण करतंय”, असेही संजय राऊतांनी सांगितले.

“आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो, की त्यांनी एकच होतोडा मारला, आतातरी या सरकारचे डोकं ठिकाणावर येईल, जनतेचे डोके ठिकाणावर आहे. या सरकारचा एकमेव हेतू आहे की, या राज्यात अशांतता निर्माण व्हावी. दंगली घडाव्यात. राज्यातील गृहमंत्रालय अस्थित्वात आहे का? हाच मोठा प्रश्न आहे. सध्या फडणवीस दिसत नसून, कुठेतरी निराश आणि वैफल्यग्रस्त अवस्थेत काम करताना दिसत आहेत. त्याची कारणे शोधावी लागतील. ती कारण जाहीर सांगण्यासारखी नाहीत”, असेही संजय राऊत म्हणाले.

“संभाजीनगरमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली ते सरकारचे अपयश आहे. या घटनेचा महाविकास आघाडीच्या सभेवर काही परिणाम होणार नाही. शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या सर्व सभा व्यवस्थित होतील”, असेही राऊतांनी सांगितले.


हेही वाचा – शिंदे-फडणवीस सरकारमध्ये हिम्मत नाही, सरकार नपुंसक; सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

First Published on: March 30, 2023 10:32 AM
Exit mobile version