पुणे पोटनिवडणूक : महाविकास आघाडीत मतभेद, पण राऊत म्हणतात ‘कसेल त्याची जमीन’

पुणे पोटनिवडणूक : महाविकास आघाडीत मतभेद, पण राऊत म्हणतात ‘कसेल त्याची जमीन’

आगामी काळातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरूवात केली आहे. अशातच पुण्यातील पोटनिवडणुकीवर नव्याने राजकारण सुरू झाले आहे. ही पोटनिवडणूक लढवण्यासाठी सर्वच पक्षांची तयारी असल्याचे पाहायला मिळते. अशातच पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जास्त असून, ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळावी अशी मागणी अजित पवार यांनी केली होती. त्यानंतर आता ठाकरे गटानेही दावा केल्याचे पाहायला मिळतेय. ‘कसेल त्याची जमीन याप्रमाणे जो जिंकेल त्याची जागा हे सूत्तर ठरले तर ‘कसबा’प्रमाणे पुणे लोकसभा पोटनिवडणूक महाविकास आघाडीला सहज जिंकता येईल’, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले.

खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरून पुण्यातील पोटनिवडणुकीवर भाष्य केले. “कसेल त्याची जमीन याप्रमाणे जो जिंकेल त्याची जागा हे सूत्तर ठरले तर ‘कसबा’प्रमाणे पुणे लोकसभा पोटनिवडणूक महाविकास आघाडीला सहज जिंकता येईल. जागांचा आकडा वाढवण्याचा हट्ट अनाठायी आहे. जिंकेल त्याची जागा या सूत्राने महाराष्ट्र व देश जिंकता येईल. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकानं थोडा थोडा त्याक करावाच लागेल. जय महाराष्ट्र”, असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.

या ट्वीटमध्ये संजय राऊतांनी विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे या तिघांना टॅग केले आहे. (MP Sanjay Raut Tweets On Pune Loksabha Constituency Opposition Leader Ajit Pawar Nana Patole Claims)

दरम्यान, एकीकडे पुण्याच्या जागेसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष उत्सुक आहेत, तर दुसरीकडे त्याग करण्याचा सल्ला देणाऱ्या संजय राऊतांनीच ठाकरे गटाच्या १९ जागा कायम राहतील, असे काही काही दिवसांपूर्वी सांगितले होते. त्यामुळे पुण्यातील या जागेवर महाविकास आघाडीतील कोणता पक्ष निवडणूक लढवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – कर्नाटकच्या पराभवानंतर मोदींकडून भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा क्लास, योगींच्या अनुपस्थितीची चर्चा?

First Published on: May 29, 2023 11:20 AM
Exit mobile version