15 दिवसांच्या राजकीय स्फोटाबाबत सुप्रिया सुळेंचा एक दावा खरा, आता दुसरा काय?

आमचे सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी करणार-सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मोठा गौप्यस्फोट केला. मुंबईतील वाय.बी.चव्हाण केंद्रामध्ये शरद पवारांनी अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. शरद पवारांनी भाकरी फिरवणारे विधान केल्यामुळे पक्षात काहीतरी नक्कीच घडणार?, असे प्रश्न उपस्थित होत होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी 15 दिवसांच्या राजकीय स्फोटाबाबत खासदार सुप्रिया सुळेंनी दोन दावे केले होते. त्यापैकी शरद पवारांचा एक दावा समोर आला असून दुसरा दावा काय?, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी 15 दिवसांत दोन राजकीय स्फोट होतील, असे संकेत दिले होते. एक महाराष्ट्रात आणि दुसरा दिल्लीत. अशा परिस्थितीत शरद पवारांनी एक स्फोट महाराष्ट्रात केला असून दुसरा गौप्यस्फोट दिल्लीत होणार का?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. कारण भाकरी योग्य वेळी फिरवली नाही तर ती करपते, असे शरद पवार यांनी नुकतेच सांगितले होते. म्हणजेच नेतृत्व बदलाची हीच योग्य वेळ असल्याचे संकेत पवारांनी दिले होते. यानंतर काही दिवसांनी शरद पवारांनी वाय.बी.चव्हाण सेंटरमधून भाकरी फिरवली. पहिला राजकीय स्फोट महाराष्ट्रातून झाला आहे. आता दुसरा राजकीय धमाका काय होऊ शकतो हे फारच रंजक आहे.

हा निर्णय 1 मे लाच होणार होता

27 एप्रिलला 3 तास अजित पवार आणि शरद पवार यांच्यात दोन तास चर्चा झाली आणि हा तोडगा ठरला होता. सुप्रिया सुळे , प्रतिभा पवार, अजित पवार आणि शरद पवार यांच्यात निर्णय ठरला होता. हा निर्णय कालच होणार होता मात्र काल 1 मे असल्यामुळे निर्णय जाहीर केला नाही. आज ना उद्या हा निर्णय होणार होता, असे म्हणत अजित पवार यांनी आपली ठोस भूमिका स्पष्ट केली. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नवा अध्यक्ष काम करेल. देशभरात मीटिंग करणे, लोकांना भेटणे सुरू राहिल. कोणीही अध्यक्ष झाले, प्रांताध्यक्ष झाले तरी शरद पवार यांच्याच मार्गदर्शनाखाली हा पक्ष चालणार आहे.


हेही वाचा : पवारसाहेब राजीनाम्यावर ठाम, नव्या अध्यक्षाला साथ देऊ : अजित


 

First Published on: May 2, 2023 5:31 PM
Exit mobile version