MPSC Recruitment 2023 : तब्बल 8,169 पदांसाठी निघाली जाहिरात

MPSC Recruitment 2023 : तब्बल 8,169 पदांसाठी निघाली जाहिरात

एमपीएससीच्या (MPSC) उमेदवारांसाठी एक महत्त्वाचा बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तब्बल 8 हजार 169 पदासांठी जाहिरात काढली आहे. महाराष्ट्र अराजपात्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून पदे भरली जाणार आहेत. ही परीक्षा 30 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. (mpsc recruitment 2023 recruitment for more than 8000 posts)

महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रावर परीक्षा घेतली जाणार आहे. तसेच, महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2 सप्टेंबर 2023 रोजी तर महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2023 शनिवारी 9 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांना अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते दिले जाणार आहेत.

सहाय्यक कक्ष अधिकारी यांची 70 पदे भरली जाणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील 8 पदे भरली जाणार आहेत. तसेच, वित्त विभागाचे राज्य कर निरीक्षक 159 पदे तर ग्रह विभागाचे पोलीस उपनिरीक्षक 374 पदे भरली जातील. यांचा पगार 38 हजार 600 ते एक लाख 22800 रुपयांपर्यंत असेल. गृह विभागाच्या दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांचे एकूण 6 पदे भरली जाणार आहेत. पगार 32 हजार ते एक लाख एक हजार 600 रुपये इतका असेल. वित्त विभाग तांत्रिक सहाय्यक एक जागा असेल. यांचा पगार 29 हजार 200 ते 92 हजार 300 रुपये इतका असेल. वित्त विभागाच्या कर सहाय्यक 468 पदे भरली जाणार आहेत. या जागांसाठीचा पगार 25500 ते 81100 रुपये इतका असेल.

मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाच्या महाराष्ट्रातील विविध कार्यालयात लिपिक टंकलेखनाच्या 7034 जागा या भरल्या जाणार आहेत. मंत्रालयातील प्रसाशकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रीत विविध कार्यलयासाठी या जागा भरल्या जाणार आहेत. यांच्या पगाराचा स्केल 19900 ते 63 हजार 200 रुपये असतील.


हेही वाचा – निवडणूक आयोग शिवसेनेचे नाव आणि चिन्ह आम्हाला देईल; शिंदे गटाच्या किरण पावसकरांना विश्वास

First Published on: January 20, 2023 4:54 PM
Exit mobile version