मुंबईवारी करणारा भाजीपाला व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह

मुंबईवारी करणारा भाजीपाला व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह
भाजीपाल्याच्या खरेदी-विक्रीच्या निमित्ताने नाशिक आणि मुंबईच्या बाजारात ये-जा करणारा एक भाजीपाला व्यापारी कोरोना बाधित झाल्याचे निष्पन्न झाला असुन त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत एकच खळबळ उडाली असून व्यापारीवर्गासह अन्य घटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान  बाधीत व्यापारी राहत असलेला पेठरोड परिसरातील भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे. तसेच या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २८ जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.
नाशिक शहरासह जिल्हा भरातून बाजार समितीत पालेभाज्या व फळभाज्यांची आवक होते असते. या ठिकाणी शेतकरी, आडतदार, व्यापारी, हमाल मापारी  चवली दलालांसह छोटे मोठे व्यापारी तसेच ग्राहक येत असतात. सध्या जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. नाशिक शहरात कोरोना बाधितांची संख्या  दिवसेंदिवस वाढत असून,पेठ रोड वरील राम नगर उद्यान जवळ राहणारा आणि बाजार समितीत व्यापार करुन हा व्यापारी भाजीपाला मुंबई पाठवीत होता त्याचेवसततचे मुंबई त जाणे येणे असल्याने आणि विषेशत:त्याला  मुधुमेहाचा त्रास वाढू लागल्याने शासकीय रुग्णालयात तपासणी साठी गेले असता त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. शुक्रवार (ता.२२) रोजी त्याचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर पंचवटी विभागीय अधिकारी विवेक धांडे, वैद्यकीय अधीक्षक विजय देवकर, अधिकारी व कर्मचारी यांनी परिसराची पाहणी करून कोरोना बाधित रुग्णाचे राहते घर, चाळ प्रतिबंधित केले असून बाजार समितीत सोबत काम करणारे व सतत संपर्कात आलेले २८ जणांना वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. याप्रकरणामुळे बाजार समितीत काम करणारे व्यापारी, हमाल, मापारी, बाजार समितीचे कर्मचारी आणि संचालक मंडळामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे
First Published on: May 24, 2020 12:31 AM
Exit mobile version