ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश : मालेगावचे मुंबई-गुजरात कनेक्शन उघड

ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश : मालेगावचे मुंबई-गुजरात कनेक्शन उघड

एक कोटीच्या एमडीसह नायजेरीयन नागरिकाला अटक

कुत्तागोळीसह इतर अंमली पदार्थ तस्करीचा अड्डा बनलेल्या मालेगावातील नशेचं रॅकेट पुन्हा एकदा उघडकीस आलंय. मालेगावच्या अंमली पदार्थांचं कनेक्शन थेट धुळे आणि गुजरात व्हाया मुंबई असं असल्याचं मुंबईच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ब्युरो (एबीसीबी) विभागाने केलेल्या कारवाईत दिसून आलंय. या कारवाईत विभागाने ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या रुबीना नियाज शेख हिला अटक केलीय.

मुंबईच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एबीसीबी) विभागाने अलिकडेच गुजरातमध्ये मीरादारात झोपडपट्टीत अंमलीपदार्थ विक्री रोखण्यासाठी छापे टाकले. त्यात रुबीनाचं नाव पुढे आलं होतं. तपासात रुबीनाच ड्रग्ज माफिया असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर तातडीने चक्र फिरवत पोलिसांनी रुबीनाला अटक केली, मात्र टोळीचा म्होरक्या निलोफर सांडोले फरार झाला. रुबीनाने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या टोळीने मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणावर जाळं निर्माण केलं आहे. याच पैशांच्या बळावर रुबीनाने मालेगावातील उच्चभ्रू वस्तीत कोट्यवधींची मालमत्ता जमावलीय. या ठिकाणी तिचे तीन अलिशान बंगलेदेखील आहेत. तर, सायने शिबारात लाखो रुपये किंमतीची जमीनदेखील आहे. रुबीने आपल्या हँडलर्स आणि पंटरच्या माध्यमातून राज्यभरात अंमली पदार्थांचा पुरवठा करत होती.

कुत्ता गोळीच्या शहरात एमडीला मागणी

कुत्ता गोळी अर्थात अल्फ्रोझोलम गोळ्यांचा मालेगावात अनेक वर्षांपासून बेसुमार वापर होतो आहे. आजवर कोणतीही यंत्रणा या धंद्याला रोखू शकलेली नाही. ज्या गोळ्या केवळ डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन असलं तरच दिल्या जातात, त्या गोळ्या मालेगावात मात्र सर्रास विकत मिळतात. मात्र, त्यातही पैसे दुप्पट, चौपट करण्याचं गणित कायम असतं. डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन असल्यास १५ गोळ्यांची अल्फ्रोझोलमची स्ट्रीप मेडिकलमध्ये ४५ रुपयांना मिळते. मात्र, या गोळ्यांचे व्यसन लागलेल्या व्यक्तींना हीच तीन रुपयांची एक गोळी १० ते ५० रुपयांपर्यंत विकली जाते. नशेसाठीच्या गोळ्या, गांजा, चरस, इफेड्रीन याबाबतदेखील अशीच परिस्थिती आहे. गुन्हेगारांचा हा धंदा कोट्यवधींच्या घरात आहे. या गोळ्यांपाठोपाठ आता एमडीनेही मालेगावात चांगलाच जम बसवलाय.

First Published on: October 2, 2021 12:19 PM
Exit mobile version