तन्मय फडणवीसला कोणत्या आधारे लस दिल्याची माहिती सेव्हन हिल्सने दिली नाही – महापौर

तन्मय फडणवीसला कोणत्या आधारे लस दिल्याची माहिती सेव्हन हिल्सने दिली नाही – महापौर

तन्मय फडणवीसला कोणत्या आधारे लस दिल्याची माहिती सेव्हन हिल्सने दिली नाही - महापौर

विरोधी पक्षनेते देवेंद्र पडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस याने कोरोना लस घेतल्याचं समोर आलं आहे. देशात ४५ वर्षावरील नागरिकांचं लसीकरण केलं जात आहे. मग तन्मय फडणवीस याचं वय ४५ पेक्षा अधिक नसताना कशी काय लस मिळाली? असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. यानंतर तन्मयने ज्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये लसीचा दुसरा डोस घेतला त्या इन्स्टिट्यूटने स्पष्टीकरणामध्ये तन्मयने पहिला डोस मुंबईतील सेव्हन हिल्समध्ये घेतल्याचं सांगितलं. त्यामुळे आता सेव्हन हिल्सने कशाच्या आधारावर लस दिली याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर घेत आहेत.

तन्मय फडणवीसला कोणत्या आधारे लस दिली याची माहिती सेव्हन हिल्सने अद्याप दिलेली नाही, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. तन्मय फडणवीस हे लहान आहेत. आम्ही कोव्हीड योद्धे म्हणुन लस देतो, तन्मयला कोणत्या आधारे लस दिली याची माहीती घेतोय, असं महापौर म्हणाल्या. अद्यापही मला सेव्हन हील्स कडून मला माहीती मिळाली नाही आहे, असं देखील त्यांनी सांगितलं. तन्मय लहान आहे. राजकीय घराण्यातील आहे. त्याने थांबलं पाहीजे होतं, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी लॉकडाऊन करणार

राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक दि चैन अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, रुग्णसंख्येत घट होताना दिसत नाही आहे. आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. त्यामुळे लॉकडाऊन केला जाणार आहे. याबाबत बोलताना महापौर पेडणेकर म्हणाल्या सगळ्या मंत्र्यांनी लॉकडाऊन बद्दल सूतोवाच केलेला आहे. कोरोना वाढू नये म्हणून सरकार निर्णय घेणार असल्याचं कळत आहे. आरोग्य यंत्रणेवर ताण वाढतोय हा ताण आणखी वाढू नये यासाठी राज्यसरकार लॉकडाऊन करणार असल्याचे कळतंय, असं महापौर म्हणाल्या.

 

First Published on: April 21, 2021 11:58 AM
Exit mobile version