अर्थ केअर अवार्ड : मुंबई महापालिकेच्या श‍िरपेचात मानाचा तुरा

अर्थ केअर अवार्ड : मुंबई महापालिकेच्या श‍िरपेचात मानाचा तुरा

मुंबई महापालिकेने (BMC) विशेषतः उद्यान खात्याने पर्यावरण समृद्धीसाठी आतापर्यंत केलेल्या कामांची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या उद्यान खात्याचा ‘अर्थ केअर अवार्ड’ने सन्‍मान करण्यात आला आहे.
मुंबई महापालिका उद्यान खात्याकडून ७०० पेक्षा अधिक उद्यानांची आणि लक्षावधी झाडांची शास्त्रशुद्ध काळजी नियमितपणे घेण्यात येते. मुंबई महापालिका पर्यावरण विभाग व उद्यान खाते मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी व पर्यावरण जपण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करीत असते.त्या अनुषंगानेच महापालिकेच्या उद्यान खात्याचा ‘अर्थ केअर अवॉर्ड’ने सन्मान करण्यात आला आहे. पर्यावरण विषयक विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थांचा गौरव या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने करण्यात येत असतो.

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते महापालिका उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी हा पुरस्कार उद्यान खात्याच्या वतीने स्वीकारला. मुंबईतील नर‍िमन पॉईंट परिसरातील एन.सी.पी.ए. येथील ‘टाटा थ‍िएटर’ येथे नुकत्याच संपन्न झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात पालिकेच्‍या उद्यान खात्‍याला ‘अर्थ केअर अवाॅर्ड” ने सन्‍मान‍ित करण्‍यात आले.

हेही वाचा : bmc election : ओबीसी आरक्षणासाठी पुन्हा लॉटरी?, महापालिका आयुक्तांकडून आढावा बैठक

‘टोवर्ड्स क्लायमेट रिसिलिएंट अँड ग्रीन मुंबई’ (Towards Climate Resilient and Green Mumbai)’ या उद्यान खात्याच्या महत्‍वाकांक्षी प्रकल्‍पाला ‘अर्बन सेंटर क्लायमेट चेंज मॅनेजमेंट’ (Urban Centered Climate Change Management) या श्रेणी अंतर्गत गौरविण्यात आले आहे. ‘अर्थ केअर अवॉर्ड्स’ (ECAs) हा जेएसडब्ल्यु’ आणि टाईम्स समूहाचा संयुक्त उपक्रम आहे.

या पुरस्‍काराने महापालिकेच्याच नव्‍हे, तर सर्व मुंबईकरांच्‍या श‍िरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. मुंबई महापालिकेची पर्यावरण पूरक कामे ही योग्य दिशेने होत असल्याचे अधोरेखित झाले आहे, असे नमूद करत उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी पालिकेतील सर्व वरिष्ठ अधिकारी – कर्मचारी आणि पुरस्कार निवड समितीचे आभार मानले आहेत.


हेही वाचा : Maharashtra Corona Update : राज्यात मागील २४ तासांत १ हजार ३५७ कोरोना रुग्णांची नोंद; तर एकाचा मृत्यू


 

First Published on: June 4, 2022 10:05 PM
Exit mobile version