मुंबईची जलवाहिनी ठाण्यात फुटली; लाखो लिटर पाणी वाया, ‘या’ भागांमध्ये पाणी कपात

मुंबईची जलवाहिनी ठाण्यात फुटली; लाखो लिटर पाणी वाया, ‘या’ भागांमध्ये पाणी कपात

ठाणे येथील कोपरी पुलाजवळ ठाणे महापलिकेतर्फे नवीन पुलाचे काम सुरु असताना कामगारांच्या हलगर्जीपणामुळे, ठाणे जिल्ह्यातील धरणांमधून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मुंबई महापालिकेची २,३४५ मिलीमीटर व्यासाची ‘मुंबई २’ जलवाहिनी फुटली. त्यामुळे आतापर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेल्याचे समजते.

या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पालिका जल अभियंता खात्यामार्फत युद्धपातळीवर हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी ९ मार्च रोजी सकाळी १० वाजेपासून ते ११ मार्च रोजी सकाळी १० पर्यंत म्हणजेच ४८ तासांसाठी शहर व पूर्व उपनगरातील काही भागात होणाऱ्या पाणी पुरवठ्यात १० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे.

सदर पाणी कपातीचा कालावधीत पाहता संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणी कपातीपूर्वी अगोदरच्या दिवशीच पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

शहर व पूर्व उपनगरे येथील ज्या भागात पाणी कपात लागू होणार त्यांची माहिती पुढीलप्रमाणे – 

पूर्व उपनगरे

– टी विभाग -: मुलूंड (पूर्व) व (पश्चिम) विभाग

– एस विभाग -: भांडूप, नाहूर, कांजूरमार्ग, विक्रोळी येथील पूर्व विभाग.

– एन विभाग -: विक्रोळी (पूर्व), घाटकोपर येथील (पूर्व) व (पश्चिम) विभाग

– एल विभाग -: कुर्ला (पूर्व) विभाग

– एम/पूर्व विभाग -: चेंबूर (पूर्व) संपूर्ण विभाग

– एम/पश्चिम विभाग -: चेंबूर ( पश्चिम), मानखुर्द, शिवाजी नगर, गोवंडी आदी संपूर्ण विभाग

शहर :

– ए विभाग -: कुलाबा, बीपीटी व नौदल परिसर

– बी विभाग -: सॅन्डहर्स्ट रोड संपूर्ण विभाग

– ई विभाग -: भायखळा संपूर्ण विभाग

– एफ/दक्षिण विभाग -: परळ संपूर्ण विभाग

– एफ/उत्तर विभाग -: माटुंगा, वडाळा  संपूर्ण विभाग


हेही वाचा : तुम्हाला कसा नेता हवा?घडवणारा की बिघडवणारा?, पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेंवर


 

First Published on: March 4, 2023 8:18 PM
Exit mobile version