‘महापालिकेच्या लिपिकांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती द्यावी’

‘महापालिकेच्या लिपिकांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती द्यावी’

'महापालिकेच्या लिपिकांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती द्यावी'

मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबई महापालिकेकडून घेण्यात येणारी मुख्य लिपिक पदाची परीक्षा रद्द करावी. तसेच, अनुभव आणि सेवाज्येष्ठतेनुसार सेवेत असलेल्या लिपिकांना पदोन्नती द्यावी, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे केली आहे. मुंबई शहर व उपनगरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून रुग्णालयात बेडची कमतरता भासत आहे. अशा भीषण परिस्थितीतही पालिका अधिकारी व कर्मचारी हे आपला जीव धोक्यात घालून कामावर येऊन आपले कर्तव्य बजावत आहेत.

त्यामध्येच, पालिकेच्या काही अधिकारी व कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर काहींक उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत १६, १७ आणि १८ एप्रिलला होणारी मुख्य लिपिक पदाच्या परीक्षा रद्द करावी. तसेच, पालिकेत काम करणाऱ्या लिपिकांना असलेला कामाचा अनुभव आणि त्यांची सेवाज्येष्ठता लक्षात घेऊन त्यांना तात्काळ पदोन्नती देण्यात यावी, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेतर्फे बाबा कदम यांनी केली आहे.

मुंबईची तुंबई होणार नाही यासाठी उपाययोजना 

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात काही सखल भागात पाणी साचण्याच्या घटना घडतात. त्यामुळे रेल्वे व रस्ते वाहतुकीवर,जनजीवनावर त्याचा विपरीत होणारा परिणाम लक्षात घेता, यंदा पावसाळ्यात कुठेही पाणी साचून मुंबईची तुंबई होणार नाही, याची दक्षता घ्यावी आणि त्यासाठी प्रत्येक प्राधिकरणाने सूक्ष्म नियोजन करावे, असे आदेशही पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी संबंधित यंत्रणेला दिले. तसेच, मुंबईत अनेक ठिकाणी सध्या मुंबई मेट्रो रेल्वेची कामे प्रगतीपथावर आहेत. या अनुषंगाने या बांधकामातून निघणारा राडारोडा वेळच्यावेळी हलवावा तसेच या कामांमुळे पावसाळ्या दरम्यान कुठेही पाणी साचणार नाही, याची काटेकोर काळजी मुंबई मेट्रो प्रशासनाने घ्यावी, असे आदेशही आयुक्त यांनी दिले. तसेच विद्युत वितरण व्यवस्थेचे आवश्यक ते ऑडिट करवून घ्यावे, अशी सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी केली.

First Published on: April 12, 2021 10:54 PM
Exit mobile version