महाविकास आघाडीने महाराष्ट्राला खाली आणले; फडणवीसांचा आरोप

महाविकास आघाडीने महाराष्ट्राला खाली आणले; फडणवीसांचा आरोप

वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला हलवण्यात आला आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण प्रचंड तापले असून विरोधकांकडून सत्ताधारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहेत. तसेच, “महाविकास आघाडीने महाराष्टाराला खाली आणले”, असा आरोपही केला. (MVA government brought down Maharashtra dcm devendra fadnavis allegations)

“गुजरातच्या अर्थव्यवस्थेत जामनगर रिफायनरी आणि मुद्रा पोर्टचा मोठा वाटा मोठा आहे. मात्र आपल्याकडे रिफायनरीलाच विरोध करण्यात आला. मी अनिल अग्रवाल यांच्याशी बोललो होतो. गुजरातपेक्षा चांगले पॅकेज करतो म्हटले. त्यावर ते म्हणाले की, आम्ही महाराष्ट्रात नक्कीच गुंतवणूक करू, पण आता आमचा निर्णय झालेला आहे”, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

“अनिल अग्रवाल यांचा निर्णय आमचे सरकार येण्याच्या आधीच झाला होता. आम्ही आल्यानंतर आम्ही खूप प्रयत्न केला. मात्र ज्यांनी काहीच केलं नाही ते आमच्याकडे बोट दाखवत आहेत. तुमच कर्तृत्व काय आहे, हे सांगा, असा सावल करत, महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्र गुजरातच्या मागे गेला आहे. मात्र पुढील दोन वर्षात महाराष्ट्राला निश्चित पुढे नेणार”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

मुंबई-नागपुर एक्स्प्रेस वे म्हणजे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी विरोध केला असल्याचेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. ‘मात्र, त्यावेळी आम्ही सगळ्या विरोधकांवर मात करत मुंबई-नागपुर एक्स्प्रेस वेचे काम मार्गी लावले’, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

राज्यात मुख्यमंत्रिपदावर असताना २०१४ ते २०१९ या पाच वर्षात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर ठेवला. मात्र उद्धव ठाकरे यांच्या काळात महाराष्ट्राची पीछेहाट झाली. गुजरात महाराष्ट्राच्या पुढे गेला. महाराष्ट्रातील गुंतवणूक २६ बिलियन डॉलरवरून १८ बिलियन डॉलरपर्यंत खाली आली. जामनगर रिफायनरी आणि मुंद्रा बंदर हा गुजरातच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पण तुम्ही नाणार रिफायनरी आणि वाढवण बंदराला विरोध करता तर महाराष्ट्र गुजरातच्या पुढे कसा जाईल? असा सवाल करत फाफ यांनी हे दोन प्रकल्प महाराष्ट्राला पुढचे वीस वर्ष पहिल्या क्रमांकावर ठेवू शकतात, असा दावा केला.

मेट्रो, बुलेट ट्रेन अशा प्रकल्पांनाही तुमचा विरोध आहे. समृध्दी महामार्गालाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोध केला होता. दोघांनी शेतकऱ्यांच्या सभा घेतल्या होत्या. हा प्रकल्प आम्ही पूर्ण केला. हा प्रकल्प आता राज्याचा गेम चेंजर प्रकल्प ठरणार आहे, असे सांगतानाच फडणवीस यांनी पुढच्या दोन वर्षात राज्याला उद्योग आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.

सबसिडी देताना भ्रष्टाचार

महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्योगांना जमिनी आणि सबसिडी देण्यात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला. आमच्या सरकारच्या काळात उद्योगांना सबसिडी मिळवण्यासाठी नवा पैसाही लागत नव्हता. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्या मिळवण्यासाठी पैसे द्यावे लागत असतील तर काय अवस्था होणार? असा सवाल फडणवीस यांनी केला. अधिकाऱ्यांनाही या काळात वाईट सवयी लागल्या आहेत. मात्र यापुढे सरकारने घेतलेल्या निर्णयांची जे अधिकारी अंमलबजावणी करणार नाहीत त्यांना घरी बसून, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.


हेही वाचा – …म्हणूनच चहलसाहेब मी तुमचा सत्कार केला, मुख्यमंत्री शिंदेच्या फटकेबाजीला इंजिनिअर्सची दाद

First Published on: September 16, 2022 6:20 PM
Exit mobile version