माझं रक्त शिवसेनेचं, उद्धव ठाकरेंसोबतच…, मनोहर जोशींनी केलं स्पष्ट

माझं रक्त शिवसेनेचं, उद्धव ठाकरेंसोबतच…, मनोहर जोशींनी केलं स्पष्ट

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी

मुंबई – ज्येष्ठ आणि निष्ठावंत शिवसैनिक मनोहर जोशी (Manohar Joshi) शिवसेनेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबतच कायम असल्याची महत्त्वाची माहिती आज समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, मनोहर जोशी यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

माझं रक्त शिवसेनेचं आहे. आधी शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहवास, नंतर उद्धवजींचा सहवास, मी महाराष्ट्र, शिवसेनेसाठी आहे. शिवसेना ही संघटना महाराष्ट्रावर अतोनात प्रेम करते. बाळासाहेबांच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकलो याचं समाधान आहे, असं मनोहर जोशी म्हणाले. मी उद्धव ठाकरेंसोबत सातत्याने उभा आहे. मी पहिल्यापासून आतापर्यंत शिवसेनेतच आहे, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली बाळासाहेबांच्या शिलेदारांची भेट

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचेही ‘अष्टप्रधान मंडळ’ ओळखले जायचे. त्यात मनोहर जोशी, सुधीर जोशी, प्रमोद नवलकर, दत्ताजी नलावडे, शरद आचार्य, लीलाधर डाके, दत्ताजी साळवी, वामनराव महाडिक यांचा समावेश होता. त्यापैकी आता केवळ मनोहर जोशी आणि लीलाधर डाके हयात आहेत. उद्धव ठाकरे यांच्या हाती पक्षाची सूत्रे आल्यानंतर नव्या दमाची फळी उभी राहिली आणि ओघानेच शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील नेते बाजूला पडले.

हेही वाचा – मनोहर जोशी, लीलाधर डाकेंकडून मुख्यमंत्र्यांनी निष्ठा शिकून घ्यावी, शिंदेंना राऊतांचा सल्ला

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर या नेत्यांची भेट घेतली होती. मनोहर जोशी यांना भेटून त्यांचा आशीर्वाद घेतला होता. तसंच, त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली होती.

हेही वाचा – गजानन किर्तीकरांना शिंदे गटा कडून मोठी ऑफर

First Published on: December 2, 2022 12:44 PM
Exit mobile version