Cruise Drugs Case: जेलमध्ये माझ्या मुलाचे ७ किलो वजन झाले कमी, अरबाज मर्चंटच्या वडिलांची प्रतिक्रिया

Cruise Drugs Case: जेलमध्ये माझ्या मुलाचे ७ किलो वजन झाले कमी, अरबाज मर्चंटच्या वडिलांची प्रतिक्रिया

Cruise Drugs Case: जेलमध्ये माझ्या मुलाचे ७ किलो वजन झाले कमी, अरबाज मर्चंटच्या वडिलांची प्रतिक्रिया

क्रझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात (Cruise Drugs Case) अटकेत असलेल्या शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानचा जामीन काल, गुरुवारी मुंबई हायकोर्टाने मंजूर केला (aryan khan got bail in drugs-on-cruise case by Bombay HC). आर्यनसोबत अरबाज मर्चंट (Arbaz Merchant) आणि मुनमुन धमेचा (Munmun Dhamecha) यांच्याही जामीन मंजूर करण्यात आला. यामुळे आता शाहरुख खानच्या मन्नतमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तब्बल २५ दिवसांनंतर आर्यन खानसह अरबाज आणि मुनमुन जेल बाहेर येणार आहेत. अरबाज मर्चंटचे वडील असलम मर्चंट ३४ हजार ५६० मिनिट या क्षणांची वाट पाहत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रसार माध्यमांशी बोलताना अरबाजचे वडील असलम मर्चंट म्हणाले की, ‘आम्ही या क्षणाची ३४ हजार ५६० मिनिट वाटत पाहत होतो. माझी पत्नी दिवस नाहीतर मिनिट मोजत होती. अशा प्रकरणात या लोकांना ठिक करायचे असेल तर ते तुरुंगात नाही तर पुनर्वसन केंद्रात असावे. जेलमध्ये माझ्या मुलाचे वजन ७ किलो कमी झाले आहे. तर आर्यन खान बिस्किटांवर दिवस काढत होता.’

दरम्यान आर्यन खानचे वकील मुकुल रोहतगी हायकोर्टाच्या निकालानंतर म्हणाले की, ‘उद्या सविस्तर ऑर्डरची कॉपी मिळेल. आज किंवा उद्या, शनिवार जामीन मिळालेले सर्व आरोपी जेल बाहेर येतील अशी आशा आहे. आर्यन मुंबईच्या आर्थररोड जेलमध्ये बंद आहे.’

नियमानुसार जामीन मिळाल्यानंतर ५ वाजण्याच्या आधी आर्थर रोड जेल बाहेरील बॉक्समध्ये जामीन पत्र टाकणे गरजेचे असते. जर आर्यनच्या टीमने स्पेशल एनडीपीएस कोर्टाकडून काल जामीन ऑर्डर घेतली असती आणि जेल बाहेरील जामिनाच्या बॉक्समध्ये टाकली असती तर आज सकाळी ६ वाजता जामीन पेटी खोल्यानंतर काही तासांत आर्यन जेल बाहेर आला असता. त्यामुळे आर्यन आज किंवा उद्या जेलबाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा – Cruise Drug Case: “मी एनसीबी ड्रग्ज कारवाईच्या विरोधात नाही”, नवाब मलिकांची त्या ट्विटवर प्रतिक्रिया


 

First Published on: October 29, 2021 8:07 AM
Exit mobile version