घरताज्या घडामोडीCruise Drug Case: "मी एनसीबी ड्रग्ज कारवाईच्या विरोधात नाही", नवाब मलिकांची त्या...

Cruise Drug Case: “मी एनसीबी ड्रग्ज कारवाईच्या विरोधात नाही”, नवाब मलिकांची त्या ट्विटवर प्रतिक्रिया

Subscribe

कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणात एनसीबीने केलेली कारवाई बनवाट असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. यामुळे आर्यन खानला पाठिंबा देत असल्याचा आरोप नवाब मलिकांवर करण्यात येत आहे. मलिकांनी आर्यनच्या जामीन मिळण्याच्या निर्णयानंतर पिक्चर अभी बाकी हे मेरे दोस्त असं ट्विट केलं होते. या ट्विटवर मलिकांनी प्रतिक्रिया देताना आपण एनसीबी कारवाईच्या विरोधात नाही असे म्हटलं आहे. तसेच एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात आहे. वानखेडे बोगस कारवाई करत असल्याचा आरोप मलिकांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी हायकोर्टाने आर्यन खानला जामीन दिल्यावर पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त असं ट्विट केलं आहे. मलिकांनी केलेल्या ट्विटमुळे एकच चर्चा रंगली होती. अखेर नवाब मलिक यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबतची माहिती दिली आहे. नवाब मलिक म्हणाले की, कारवाई करुन निष्पाप लोकांना अडकवण्यात आलं आहे. बरेचसे अशी लोकं आहेत ज्यांना तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. हा अन्याय जो सुरु आहे त्याचा लढा शेवटपर्यंत सुरु राहणार आहे. मी आर्यन खानसाठी लढत नव्हतो परंतु हा जो बोगसपणा आहे त्याच्याविरोधात शेवटपर्यंत लढणार आहे. त्यासाठीच ते ट्विट केलं असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

क्रांती रेडकरांना काहीही करण्याचा अधिकार

क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे दाद मागितली आहे. यावर मलिक म्हणाले तो त्यांचा अधिकार कोणाकडेही दाद मागू शकतात त्यांनी जे काही करायचे आहे ते करावे. मी एनसीबी किंवा ड्रग्ज प्रकरणाच्या विरोधात नाही जे कोणी ड्रग्ज विकत असेल त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे. निष्पाप लोकांना गुंतवून पब्लिसिटी करणे, कुठेतरी दहशत निर्माण करुन हजारो कोटी रुपये वसुली होत असेल तर याविरोधात लढण्याची माझी जबाबदारी आहे. असे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

वानखेडेंचा मित्र काशिफ खान

काशिफ खान या ड्रग्ज पार्टीचा आयोजक होता की नाही? याचे उत्तर त्याने सोशल मीडियावर टाकलेल्या जाहीरातींवरुन स्पष्ट होत आहे. त्याची पार्श्वभूमी काय आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रूक आहे. फॅशन इंडिया टिव्हीचा हेड आहे. पोलिसांनाही त्याची पार्श्वभूमी माहिती आहे. आजही तो गोव्यात लपून बसला आहे. क्रूझवर कारवाईमध्ये हजारो होते पण फक्त काही लोकांनाच पकडले. एनसीबीला माहिती होती तर एनसीबीने काही दिवसांपुर्वीच शीपवर छापेमारी का केली नाही. काशिफ हा समीर वानखेडे यांचा मित्र आहे. याच्याविरोधात छापेमारी करण्यासाठी अधिकारी सांगत होते मात्र वानखेडेंनी दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला असे नवाब मलिक यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा : Aryan khan drugs case- दहा वर्षांपूर्वीही शाहरुखला नडले होते वानखेडे


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -