युट्यूब व्हिडिओ पाहून नागपूरमध्ये १२ वर्षीय मुलीचा गळफास लागून मृत्यू

युट्यूब व्हिडिओ पाहून नागपूरमध्ये १२ वर्षीय मुलीचा गळफास लागून मृत्यू

भारताविरोधात अजेंडा राबवणाऱ्या २० YouTube चॅनल्सवर बंदी

सध्याच्या आधुनिक युगात अगदी दोन वर्षाच्या मुलापासून सर्वांकडे सर्रास मोबाईल फोन आढळून येतात. त्यात युट्यूबवर कार्टूनपासून क्राफ्ट मेंकींग, रेसिपीज, गेम्स सगळंच मुलं आवडीने पाहतात. मात्र मुलांचे हे कुतूहल त्यांच्या जीवावरही बेतू शकतं. अशीच एक घटना नागपूरमध्ये घडली आहे. नागपूरच्या हंसापुरी परिसरात युट्यूबवर गळफास घेताना व्हिडिओ पाहून तसेच कृत्य करून एका १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घडली आहे. नागपूर तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हंसापुरी परिसरात गळफास घेण्यापूर्वी ही मुलगी तिच्या लहान बहिणींसोबत मोबाईलवर गळफास घेण्याचा व्हिडिओ पाहत होती. अशी माहिती पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात समोर आली आहे.

काय आहे घटना

नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्याअंतर्गत राहणाऱ्या एका कुटुंबातील तीन बहिणी गेले दोन दिवस आपल्या आईच्या मोबाईलवर आत्महत्या कशी करायची याबाबतचे व्हिडिओ पाहत होत्या. त्यांनी व्हिडिओत दिलेले प्रात्यक्षित घरातच करून पाहिले. युट्यूबवर दाखवलेल्याप्रमाणे पंखा, नायलॉन दोरी आणि त्याचे केलेले हुक असे सर्व साहित्य जमवत हा फाशीचा खेळ या मुली आपल्याच घरी खेळत होत्या. या दरम्यान, १२ वर्षीय मुलीला फाशी लागली. तिच्या लहान बहिणी लगेचच दुसऱ्या खोलीत असलेल्या आईला ही फाशी लागल्याचे सांगितले. आई धावत आली, मुलीला दवाखान्यात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

First Published on: June 30, 2019 8:19 PM
Exit mobile version