चाकू हल्ल्यात पोलीस हवालदाराचा मृत्यू

चाकू हल्ल्यात पोलीस हवालदाराचा मृत्यू

प्रातिनिधिक फोटो (सौजन्य युट्यूब)

नागपूर येथे पेट्रोल पंपावर रांगेवर उदभवलेल्या वादातून एका तरुणाने पोलीस हवालदारावर चाकू हल्ला केला आहे. या हल्ल्यात हा पोलीस हवालदाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान घटनेनंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला आहे. या प्रकरणी पोलिसांनी खूनाचा गुन्हा नोंदवला असून सीसीटीवी फुटेजच्या आधारावर आरोपींचा शोध सुरु केला आहे. विदर्भात २४ तासांमध्ये पोलिसांवर हल्ला होण्याची ही दूसरी घटना आहे. त्यामुळे आता पोलिसांच्याच सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागपूर बरोबच अमरावती आणि यवतमाळ विभागातही मागील सहा महिन्यात पोलिसांवर हल्ल्याच्या पाच ते सहा घटना घडल्या आहेत.

कशी घडली घटना

पद्माकर उके हे नागपूर पोलीस खात्यात हवालदार म्हणून कार्यरत होते. एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी ते साध्या कपड्यांवर आले होते. या पेट्रोल पंपावर गर्दी असल्याने ते पेट्रोल भरण्यासाठी रांगेत उभे होते. यावेळी येथे आलेले तरुणांनी रांग ओलांडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या दोघांमध्ये वाद झाला. या वादात माथेफिरू तरुणाने आपल्या जवळ असलेला चाकूने उके यांच्यावर हल्ला केला. या घटनेनंतर येथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये भितीचे वातावरण होते. उके यांच्यावर हल्ला करुन या तरुणाने पेट्रोल पंपावरून पळ काढला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

First Published on: November 26, 2018 12:21 PM
Exit mobile version