‘अग्निपथ’ आंदोलनाची शक्यता; नागपूर रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेत वाढ

‘अग्निपथ’ आंदोलनाची शक्यता; नागपूर रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेत वाढ

अग्निपथ योजना (Agneepath Scheme) जाहीर झाल्यापासून देशभर हिंसक आंदोलन (Youth Agitation) होत आहेत. केंद्र सरकारच्या या देशभरातून प्रचंड विरोध होत आहे. या योजनेच्या विरोधात बिहारमधील (Bihar) तरुण रस्त्यावर उतरले आहेत. या तरुणांचे अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलन सुरू असून आता त्याला हिंसक वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे स्थानकावर (Nagpur Railway Station) लोहमार्ग पोलिसांनी सुरक्षा वाढविली आहे. सकाळी ९ वाजल्यापासून ५० ते ६० पोलिस कर्मचारी व अधिकारी रेल्वे स्थानकावर बंदोबस्तात तैनात केले आहे. (Nagpur Railway Station Security Increase Agneepath Scheme Youth Agitation)

नागपूर स्थानकात पोलिसांचा (Police) फौजफाटा तैनात असून सर्व प्रकारच्या हालचालींवर करडी नजर ठेवली जात आहे. प्रवाशांसह स्थानकांवर येणाऱ्यांवर पोलिसांची नजर होती. नागरिकांच्या सुरक्षेाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्यानुसार, नागपूर लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे स्थानकाच्या समोरील परिसर तसेच मागच्या बाजूने आणि आतील सर्व रेल्वे स्थानकावरील सुरक्षेत वाढ केली आहे.

हेही वाचा – पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये आणखी वाढ, २० जूनपासून ८ फेऱ्या वाढणार

अग्निपथ योजनेमुळे सुरू झालेल्या आंदोलनाची पडसाद महाराष्ट्रासह शहरात उमटू नये पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. वरिष्ठांच्या आदेशानंतर उत्तर भारतातील अलर्ट प्राप्त झाल्यामुळे रेल्वे स्थानकावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. रात्री पेट्रोलिंग वाढविण्यात आली असल्याचे समजते.

या आंदोलनामुळे एकूण आठ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, समता एक्स्प्रेस, संघमित्रा एक्स्प्रेस, बंगळूरू हमसफर एक्स्प्रेस, बुराणी राप्ती सागर एक्स्प्रेस, सिकंदराबाद सुपरफास्ट एक्स्प्रेस, अर्नाकुलम सुपरफास्ट एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या. गाड्या रद्द झाल्याचा प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. अनेकांना वेळेवर तिकीट रद्द करावे लागले.

रिफंड घेण्यासाठी सुद्धा तिकीट आरक्षण कक्षात प्रवाशांना रांगेत उभे रहावे लागले. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.


हेही वाचा – भाडोत्री सैन्य आणल्यावर लोक का भडकणार नाहीत, उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला टोला

First Published on: June 19, 2022 3:05 PM
Exit mobile version