आरे कारशेडचा आग्रह म्हणजे मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ; नाना पटोलेंचा आरोप

आरे कारशेडचा आग्रह म्हणजे मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ;  नाना पटोलेंचा आरोप

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत मुंबई मेट्रो कारशेड आरे मध्येच होईल, असे जाहीर करून भाजपा प्रणित राज्य सरकारने पहिला घाव मुंबईकरांवर घातला आहे. पुन्हा आरेमध्येच कारशेड करण्याचा आग्रह धरणे म्हणजे मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ चालवलेला आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

आरे मेट्रो कारशेड करण्यास पर्यावरणप्रेमी आणि मुंबईकर यांचा तीव्र विरोध आहे. कारशेड आरेमध्ये होऊ नये, यासाठी मुंबईकर आणि हजारो पर्यावरणप्रेमींनी तत्कालीन फडणवीस सरकारविरोधात मोठे आंदोलन केले होते. पण पोलीस बळाचा वापर करून फडणवीस सरकारने आंदोलकर्त्यांवर कारवाई केली होती, असं नाना पटोले म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारने आरेमध्ये कारशेड न करण्याचा निर्णय घेतला. कारशेडसाठी कांजूर मार्ग येथील शेकडो एकर जागेचा विचार करण्यात आला. परंतु, त्यात केंद्र सरकार व विरोधकांनी खोडा घातला. मुंबई मेट्रो प्रकल्पालाही विरोध नाही. मुंबईतील दळणवळणाचा विचार करून मेट्रो प्रकल्प करण्याचा निर्णय सर्वात प्रथम काँग्रेस आघाडीचे सरकार असतानाच घेतला होता, असं पटोले म्हणाले.


हेही वाचा : काय तो पाऊस…’बीएमसी’ एकदम ओकेमध्ये; नवा व्हिडीओ पाहिलात का?


 

First Published on: July 1, 2022 8:47 PM
Exit mobile version