महाविकास आघाडी फडणवीस सरकारच्या काळातले घोटाळे काढणार – नाना पटोलेंचा इशारा

महाविकास आघाडी फडणवीस सरकारच्या काळातले घोटाळे काढणार – नाना पटोलेंचा इशारा

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांचे घोटाळे बाहेर काढले आहेत. यामध्ये काही नेत्यांवर कारवाईचा ससेमीरा लावला आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील नेते अडचणीत आले आहेत. आता वेळ आली आहे. महाविकास आघाडी सरकार आता तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळातील घोटाळे बाहेर काढणार असल्याचा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरोधातील घोटाळा बाहेर काढणार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटलं आहे. फडणवीस सरकारमध्ये भाजप नेत्यांनी घोटाळे केले असून त्याच्या फायली आता काढण्याची वेळ आली असल्याचे नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप सरकारला इशारा दिला आहे. भाजप महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना अडचणीत आणत आहे. आता वेळ आली आहे. महाविकास आघाडी एकत्र येऊन फडणवीस सरकारच्या काळातील फायली बाहेर काढणार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रस्ते घोटाळा केला आहे. रस्ते घोटाळ्यामध्ये पाटील यांनी पैसे खाल्ले आहेत पण दिसून आले नाहीत. त्यांनी ते सांगावे असे नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

लक्ष विचलित करण्याचा भाजपचा प्रयत्न

एकत्रित उत्तर देण्याचे कारण नाही. ते आरोप करत आहेत. ईडी आणि सीबीआयचा वापर करुन कसा दुरुपयोग केला जात आहे. सगळा देश पाहत आहे. त्यामुळे एखाद्याने ओरडावे आणि त्याच्याकडे पुर्ण लक्ष द्यावे अशा पद्धतीने कोणताही प्रयत्न नाही. कर नाही तर डर कशाला अशी महाविकास आघाडीची भूमिका आहे. त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नाला आणि जनतेच्या प्रश्नाला महाविकास आघाडी महत्त्व देते आहे. यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे.

राज्यसभेचा उमेदवार जाहीर करणार

राज्यसभा पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. राज्यसभेवर पोटनिवडणुकीसाठी आजच उमेदवार जाहीर करण्यात येणार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटलं आहे. काँग्रेसचे खासदार स्वर्गीय राजीव सातव यांच्या निधनामुळे राज्यसभेची एक जागा रिक्त झाली आहे. या जागेवर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे.


हेही वाचा : राज्यसभेवर राजीव सातव यांच्या जागी काँग्रेसमधून दोन नावांची चर्चा, तर भाजपाकडून उमेदवार जाहीर


 

First Published on: September 20, 2021 5:03 PM
Exit mobile version