घरदेश-विदेशRajya Sabha Bypoll : राज्यसभेवर राजीव सातव यांच्या जागी काँग्रेसमधून दोन नावांची...

Rajya Sabha Bypoll : राज्यसभेवर राजीव सातव यांच्या जागी काँग्रेसमधून दोन नावांची चर्चा, तर भाजपाकडून उमेदवार जाहीर

Subscribe

काँग्रेसचे नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्य सभेच्या जागेसाठी काँग्रेसकडून सध्या दोन नावं चर्चेत आहेत. तर भाजपाने आपला उमेदवार जाहीर केला आहे. निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी तारीख जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील सहा रिक्त जागांसाठी ४ ऑक्टोबरला निवडणूकीची घोषणा केली. तर त्याच संध्याकाळी निवडणूकीचा निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रासह, पश्चिम बंगाल, आसाम, मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमधील राज्यसभेवर रिक्त झालेल्या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात या जागांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून उमेदवारांची चढाओढ सुरु आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे राजीव सातव एप्रिल २०२० मधून महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेले होते, मात्र १६ मे २०२१ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांची ही राज्यसभेच्य़ा उमेदवारीची मुदत एप्रिल २०२६ मध्ये संपणार आहे. त्यामुळे राजीव सातव यांच्या जागी कोणाला स्थान मिळते याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र महाराष्ट्रातून काँग्रेसमधून दोन उमेदवारांची नावं चर्चेत असल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

यात तमिळनाडूमधून काँग्रेसला एक जागा मिळणार होती ती मिळू न शकल्याने रजनी पाटील आणि मुकुल वासनिक या दोघांचे नाव सध्या शर्यतीत असल्याची माहिती समोर येत आहे. हे दोनही उमेदवार सोनिया गांधी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात.

रजनी पाटील यांनी पहिली टर्म ही पूर्णपणे मिळाली नव्हती. यानंतर त्यांना जम्मू काश्मीर आणि हिमाचल सारख्या महत्त्वाची राज्यांच्य़ा काँग्रेसच्या प्रभारी म्हणून जबाबदारी देण्य़ात आली होती. तर काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक हेदेखील काँग्रेसमध्ये महत्त्वाचे काम पाहतात. त्यामुळे या दोघांपैकी कोणाच्य़ा नावाची वर्णी लागते हे येत्या काही तासांत स्पष्ट होईल. मात्र यात रजनी पाटील यांचे नाव सध्य़ा सर्वाधिक चर्चेत असल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisement -

यातच भाजपानेही आपला उमेदवार जाहीर केला आहे. या पोटनिवडणूकीसाठी भाजपाकडून मुंबई भाजपाचे सरचिटणीस संजय उपाध्यय यांच्या नावाची प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घोषणा केली आहे. संजय पाटील येत्या २२ सप्टेंबरला या पोटनिवडणूकीसाठी अर्ज दाखल करणार आहेत.


Kirit Somaiya : सोमय्यांनी चंद्रावर, मंगळावर जाऊन आमच्या जमिनी शोधाव्यात, सोमय्यांच्या आरोपावर शिवसेनेची प्रतिक्रिया


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -