कोरोनाकाळात लोककलावंत अडचणीत, शासनाने मदतीचा हात पुढे करावा

कोरोनाकाळात लोककलावंत अडचणीत, शासनाने मदतीचा हात पुढे करावा

लोक कलावंतांना शासनाने मतद करावी, नंदेश उमप यांची मागणी

कोरोनाच्या काळात लोककलावंताचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या हाताल काम नाही अशावेळी सरकारने या कलावंतांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन लोकशाहीर नंदेश उमप यांनी केले आहे. कोरोनाबाबत जनजागृतीचे काम या कलांवताना दिले तरी एक मोठ्या समस्येचे काही अंशी समाधान होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. पहिल्या लॉकडाऊन पासून लोक कलावंतांच्या हाताला काम नाही. त्यामुळे तंत्रज्ञ, लाईट, साऊंडवाले डेकोरेशनवाले मालक, कर्मचारी हे गेले दिड वर्ष घरी बसून आहेत. जे कलांवत चारशे ते सहाशे रुपयांत काम करतात, ज्यांचे हातावर पोट आहे अशा कलांवंतांच्या कुटुंबीयांची उपासमार सुरु झाली आहे.

महाराष्ट्रातील विशेषता ग्रामीण भागातील कलावंताचे हाल सुरु आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात या लोककलावंताचे मोठे काम आहे. लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम हे कलावंत करत असतात. कोरोनाच्या काळात हेच जनजागृती काम शासनाने या कलावंताकडे द्या. त्यामुळे कलांवतांना काम मिळेल आणि दोन पैसे देखील मिळतील.
आकाशवाणी असेल, दुरदर्शन असेल यावर छोटे छोटे कार्यक्रम करण्याची संधी शासनाने दिली तर लॉकडाऊनमध्ये घरी बसलेल्या लोकांचे मनोरंज आणि प्रबोधन असा दुहेरी योग साधता येईल. तसंच कलाकारांनाही काम मिळेल. तुर्तास या क्षणाला या कलावंतांच्या खात्यात यथाशक्ती रक्कम जमा करुन शासनाने मदतीचा हात देणे गरजेचं आहेत.

यासोबतच ऑर्केस्ट्रात काम करणारे कलाकार, नृत्य करणारे कलाकार, विविध सिरीयल्यमध्ये काम करणारे, वादक आहेत, तांत्रिक विभागात काम करणारे अशा कलाक्षेत्रात विविध स्तरात काम करणार्‍या कलावंताचा विचार राज्य आणि केंद्र सरकारने करावा अशी मागणीही नंदेश यांनी केली आहे.

 

First Published on: April 16, 2021 5:44 PM
Exit mobile version