Narayan Rane : मी लोकसभेसाठी इच्छुक नाही पण… नारायण राणे

Narayan Rane : मी लोकसभेसाठी इच्छुक नाही पण… नारायण राणे

रत्नागिरी : मी लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही. पण पक्षश्रेष्ठी योग्य निर्णय घेतील, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत केले आहे. मी कोकणात नक्की रिफानरी अणणार आहे, त्याबाबत संबंधित खात्याच्या मंत्र्यांसोबत चर्चा सुरू आहे, अशीही माहिती नारायण राणे यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

लोकसभा निवडणुकीबाबत नारायण राणे म्हणाले, “रत्नागिरीच्या जागेवर भाजपाचा दावा आहे. मी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक नाही. याबाबत निवडणुकीच्या आधी बोलणे योग्य नाही. पक्षश्रेष्ठ योग्य तो निर्णय घेतील. मी त्यांचा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही.” लोकसभा निवडणुकीत भाजपाला 48 पैकी किती जागा मिळतील ? या प्रश्नावर नारायण राणे म्हणाले, “आम्ही 48 जागा जिंकण्याचा प्रयत्न करत आहोत. ‘पैकी’ कशाला बोलायचे मी काय ज्योतिष आहे का? असा उलट सवालही त्यांनी पत्रकारांना केला.

रिफायनरीचे भवितव्य काय आहे? या प्रश्नावर नारायण राणे म्हणाले, “मी कोकणात रिफायनरी आणणार आहे. मी संबंधित मंत्र्यांशी माझे बोलणे सुरू आहे. रत्नागिरीत रिफायनरी यावी आणि येथे मोठा रोजगार तयार व्हावा, अनेक छोट्या-मोठे उद्योग, कंपनी तयार व्हावी आणि ते उद्योजक स्थानिक लोकांमधून असावेत, असे मला वाटते.”

हेही वाचा – NCP Crisis : शरद पवार गटाच्या नवीन नावाला अजितदादांचा विरोध, मात्र न्यायालयाकडून दिलासा

भाजपा ‘या’ नेत्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवणार

राज्यसभेच्या एकूण 56 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. भाजपाचे जे खासदार राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत. भाजपाच्या सदस्यांना राज्यसभेत न पाठविता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. यात पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, नारायण राणे, भागवत कराड, विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नावांचा समावेश आहे.

हेही वाचा – Jayant Patil : भाजप प्रवेशाच्या चर्चांनंतर जयंत पाटीलच आले समोर; म्हणाले- कुठेही…

राणे-फडणवीसांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट

नारायण राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवतील. याच अनुषंगाने त्यांनी 14 फेब्रुवारी रोजी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली असून उभय नेत्यांमध्ये तेथील रणनीतीबाबत चर्चा झाल्याचेही समजते.

 

First Published on: February 19, 2024 4:42 PM
Exit mobile version