घरमुंबईJayant Patil : भाजप प्रवेशाच्या चर्चांनंतर जयंत पाटीलच आले समोर; म्हणाले- कुठेही...

Jayant Patil : भाजप प्रवेशाच्या चर्चांनंतर जयंत पाटीलच आले समोर; म्हणाले- कुठेही…

Subscribe

पक्ष बदलाच्या चर्चेबाबत जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, पंधरा दिवसांनी सोडा दर आठवड्याला मी राष्ट्रवादी सोडणार अशी चर्चा रंगते. यामागे कोण आहे ? याचा शोध माध्यमांनीच घ्यावा. परंतु यातून प्रसिद्धी मिळते, याचं सगळं श्रेय माध्यमांना दिलं पाहीजे असेही यावेळी जयंत पाटील म्हणाले.

मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आज शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हेसुद्धा भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगत होती. याबाबत जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मी कुठेही जाणार नाही, अफवा पसरविणाऱ्यांना माध्यमांनीच शोधून काढावं, पण काहीही असलं तरी यातून आम्हाला प्रसिद्धी मिळते असेही ते यावेळी म्हणाले. (Jayant Patil Jayant Patil came forward after the BJP entry talks Said Anywhere)

पक्ष बदलाच्या चर्चेबाबत जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, पंधरा दिवसांनी सोडा दर आठवड्याला मी राष्ट्रवादी सोडणार अशी चर्चा रंगते. यामागे कोण आहे ? याचा शोध माध्यमांनीच घ्यावा. परंतु यातून प्रसिद्धी मिळते, याचं सगळं श्रेय माध्यमांना दिलं पाहीजे असेही यावेळी जयंत पाटील म्हणाले. मी 17 ते 18 वर्ष मंत्रिमंडळामध्ये काम केलं आहे. तेव्हा मंत्रीपदाची ऑफरच मला काही वाटत नाही. तुम्हाला काही संपर्क करतोय का? याबाबत विचारले असता मला कोणी संपर्क केलेला नाही. माझ्या सर्व आमदारांशी सकाळपासून माझा संपर्क झाला आहे. सगळे जागेवर आहेत. कुणीही कुठं जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.

- Advertisement -

महाविकास आघाडीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये दिसत आहे. त्यामुळे कुठंतरी विरोधी पक्षातील चेहऱ्यांना आपल्या पक्षात घेण्याचा प्रयत्न दिसतो. बरेच चेहरे तिकडे गेलेले आहेत पण जनतेच्या मनात काय आहे ते निवडणुकीनंतरच कळेल.

हेही वाचा : Maharashtra Politics : पक्षफुटीवरून गिरीश महाजनांचा पवार-ठाकरेंना टोला, म्हणाले…

- Advertisement -

जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात

रावेर लोकसभा मतदारसंघात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत जी चर्चा झाली त्यात एकनाथ खडसे हे त्याठिकाणी निवडणूक लढवणार होते. परंतु त्यांची प्रकृती मधल्या काळात अस्वस्थ असल्यामुळं ती निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी यापूर्वी असमर्थता व्यक्त केलेली आहे. त्यामुळे त्यांना विचारून तिथं पर्याय शोधण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण त्याला शिवसेना आणि काँग्रेस पक्षाची अजून मान्यता मिळालेली नाही. तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावर एकमत होण्याची शक्यता आहे. फक्त प्रकाश आंबेडकरांच्याशी चर्चा करून आम्ही त्यांना विश्वासात घेऊन आम्ही अंतिम योग्य तो निर्णय घेऊ.

हेही वाचा : Court Holidays : न्यायमूर्तींना मिळणाऱ्या सुट्ट्यांबाबत सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले…

जयंत पाटलांविषयी काय म्हणाले बावनकुळे?

माजी मंत्री जयंत पाटील यांच्या पक्षबदलाच्या चर्चेवर बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विकासाची गॅरंटी दिली आहे. मोदींची गॅरंटी आणि आत्मनिर्भर भारत संकल्पाला साथ देण्यासाठी अनेक लोक आमच्याकडे येण्याची तयारी करत आहेत. काहीजण तयारीत आहेत. परंतु, तुम्हा पत्रकारांकडे असलेली माहिती माझ्याकडे नाही. परंतु कधीही काहीही होऊ शकतं. मोदींना साथ देण्यासाठी कोणीही आमच्याकडे येऊ शकतं असेही ते म्हणाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -