घरमहाराष्ट्रNCP Crisis : शरद पवार गटाच्या नवीन नावाला अजितदादांचा विरोध, मात्र न्यायालयाकडून...

NCP Crisis : शरद पवार गटाच्या नवीन नावाला अजितदादांचा विरोध, मात्र न्यायालयाकडून दिलासा

Subscribe

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांचे असल्याचा निर्णय आधी निवडणूक आयोगाने दिला. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही मूळ पक्ष अजित पवार गट असल्याचा निर्णय देत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह दिलं आहे. या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज (19 फेब्रुवारी) सुनावणी पार पडली. अजित पवार गटाने शरद पवार गटाला मिळालेल्या नवीन नावाला विरोध केला, पण न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे. त्यामुळे आता शरद पवार गटाला मिळालेलं नाव पुढील आदेशापर्यंत कायम राहणार आहे. (NCP Crisis Ajit Pawars opposition to new name of Sharad Pawar group but relief from court)

हेही वाचा – Jayant Patil : भाजप प्रवेशाच्या चर्चांनंतर जयंत पाटीलच आले समोर; म्हणाले- कुठेही…

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी म्हटले की, निवडणूक आयोगाच्या ऑर्डरला स्थगिती मिळालेली नाही आहे, पण अजित पवार यांचा विरोध होता की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार हे नाव आमच्या पक्षाच्या नावासारखं आहे. त्यामुळे 27 फेब्रुवारीपर्यंत त्यांना हे नाव मिळावं. परंतु न्यायालयाने अजित पवार यांना यासंबंधी उत्तर दाखल करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ दिला आहे. त्यानंतर एक आठवड्यात शरद पवार त्याचं उत्तर दाखल करतील. पुढच्या महिन्यात पुन्हा न्यायालयात यासंबंधी सुनावणी होईल. याचवेळी न्यायालयाने असेही सांगितले की, शरद पवार चिन्हासाठी उद्या अर्ज करू शकतात आणि निवडणूक आयोगाने त्यांना एका आठवड्यात चिन्ह द्यावं, अशी माहिती सिद्धार्थ शिंदे यांनी दिली.

हेही वाचा – Maharashtra Politics : पक्षफुटीवरून गिरीश महाजनांचा पवार-ठाकरेंना टोला, म्हणाले…

- Advertisement -

शरद पवार गटाचं म्हणणं हेच होतं की, आम्हाला मिळालेलं नाव लोकसभेपर्यंत राहू दे आणि आम्हाला चिन्हही द्या. पण अजित पवार यांचा विरोध होता की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार हे नाव तुम्ही घेऊ शकत नाहीत. तुम्ही दुसरं काहीतरी नाव घ्या. पण न्यायालयाने त्यांना सांगितलं की, मतदारराजा हा हुशार आहे, त्यांनी आधी एका पक्ष आणि चिन्हाला मतदान केलं आहे. त्यामुळे आता लोकसभेतही शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार हे नाव मिळालं आहे. त्यामुळे तुमचा विरोध नसायला पाहिजे. तसेच मतदार ठरवेल, अजित पवार गटाला मतदान करायचं की, शरद पवार गटाला मतदान करायचं. त्यामुळे आता तीन आठवड्यांनी पुन्हा सुनावणी होईल. त्यावेळी शरद पवार गटाला दिलेलं नाव तेच राहिलं की, दुसरं नाव द्यायचं, अशी माहिती सिद्धार्थ शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -