खोटं बोलणाऱ्यांना बाळासाहेबांनी पक्षातून काढलं, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर राणे म्हणतात मी स्वतः पक्षातून..

खोटं बोलणाऱ्यांना बाळासाहेबांनी पक्षातून काढलं, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर राणे म्हणतात मी स्वतः पक्षातून..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि प्रमुख मंत्र्याची उपस्थिती होती. नारायण राणे यांनी शिवसेनेवर घणाघाती हल्ला केला यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. खोटं बोलणाऱ्यांना बाळासाहेबांनी पक्षातून काढलं असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी राणेंवर निशाणा साधला आहे. यावर नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. मला बाळासाहेबांनी शिवेसनेतून काढलं नाही तर मी स्वतः राजीनामा दिला असल्याचे नारायण राणे यांनी म्हटलं आहे. मुख्यमत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या शैलीतून नारायण राणेंच्या प्रत्येक टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. तब्बल १२ वर्षांनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच मंचावर आले होते.

चिपी विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. यावेळी कोकणातील विकासकामे नारायण राणे यांच्याशिवाय कोणी केली नसल्याचे राणेंनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना खोटं बोलणारे आवडत नाहीत त्यामुळे बाळासाहेबांनी खोटं बोलणाऱ्यांना शिवसेनेतून काढून टाकलं असल्याचे सांगत राणेंवर निशाणा साधला आहे. याबाबत नारायण राणेंना प्रश्न विचारण्यात आला असता राणेंनी संतापून म्हटलं आहे की, माझी हकालपट्टी केली नाही, त्यांनी माझे नावही घेतलं नाही. तसेच मी स्वतः शिवसेनेचा राजीनामा दिला असल्याचेही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांची भूमिका भयानक

मुख्यमंत्र्यांनी धातूर मातूर कसंतरी भाषण आवरलं आणि गेले. पाहुणे तरी राहतात पण मुख्यमंत्र्यांची भूमिका पाहुण्यांपेक्षा भयानक आहेत. कोकणात आले पंरतु काहीही दिले नाही आणि गेले. कोकणाने शिवसेनेला उभे केले परंतु शिवसेनेने कोकणाला काही दिले नाही असे नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, “बाळासाहेबांना खोटं बोलणारे आवडत नाही त्यामुळे त्यांनी खोटं बोलणाऱ्या शिवसैनिकांना शिवसेनेतून काढून टाकलं आहे. हा सुद्धा इतिहास आहे. कटू असेल तरी चालेल पण सत्य बोला खोटं बोलणं मला परवडणारं नाही. गेट आऊट हे बाळासाहेबांनी दाखवलं आहे” त्याच्यामुळे मला इतिहासात जायचं नाही असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राणेंवर निशाणा साधला आहे.


हेही वाचा : केंद्र सरकार विरोधात पहिल्यांदाच महाराष्ट्र बंदची हाक, महाविकास आघाडीची घोषणा


 

First Published on: October 9, 2021 6:33 PM
Exit mobile version