सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी अनेक पुरावे दिले पण मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव म्हणून अटक नाही; राणेंचा गंभीर आरोप

सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी अनेक पुरावे दिले पण मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव म्हणून अटक नाही; राणेंचा गंभीर आरोप

केंद्रीय मंत्री नारायण राणे बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी अनेक पुरावे दिले पण मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव म्हणून अटक केली नाही, असा गंभीर आणि खळबळजनक आरोप नारायण राणे यांनी केला. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर राज्यात राजकारण चांगलच तापलं होतं.

दरम्यान, सावंतवाडीत कार्यकर्त्यांशी चर्चा करताना नारायण राणे यांनी सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरुन गंभीर आरोप केले. “सुशांत कलावंत, घरात हत्या झाली, सांगितलं आत्महत्या केली. काय गरज होती त्याला आत्महत्या करायची? आम्ही अनेक पुरावे दिले, मी दिले. त्या रात्री काही लोक गेले त्याच्या घरी, ते बोलत असताना तो उलट बोलला. दिशा सॅलियनची हत्या याच लोकांनी केली होती. तो बोलला मी ते विसरु शकत नाही. कारण दिशा सॅलियन त्याची मैत्रीण होती. तिला आठव्या माळ्यावरुन फेकलं खाली. अत्याचार केला चार पाच जणांनी. त्यामुळे तो म्हणाला मी हे माफ करणार नाही. त्यामुळे ते चिडले आणि त्याला बाथरुममध्ये ठार मारलं. आम्ही सगळे पुरावे दिले, मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव, अटक नाही. दिशा सॅलियन हत्या, कुणाला अटक नाही,” असं नारायण राणे म्हणाले.

गद्दारी केल्यास मी सहन करणार नाही

पक्षात एकाला पद मिळालं म्हणून त्याला पाडायचा प्रयत्न करु नका. तुम्ही हक्काने मागा मी नक्कीच पद देईन. पण गद्दारी सहन करणार नाही, असा सज्जड दम राणेंनी कार्यकर्त्यांना भरला. तसंच, येणाऱ्या सावंतवाडी तालुका भाजपमय करण्यासाठी पक्षाचं काम तळगाळात पोहोचवा, अशा सूचना राणे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

 

First Published on: November 23, 2021 6:52 PM
Exit mobile version