ताज, एमईटी फार्मसी, अपोलो, पार्क साईड, पारेषण केंद्र, सिटी सेंटर मॉल स्वच्छतेत अव्वल

ताज, एमईटी फार्मसी, अपोलो, पार्क साईड, पारेषण केंद्र, सिटी सेंटर मॉल स्वच्छतेत अव्वल

स्वच्छ दर्पण अभियानात; ओढा ग्रामपंचायत प्रथम

स्वच्छ भारत सर्वेक्षणांतर्गत महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेत हॉटेल गटात ताज, शाळांच्या गटात आडगाव येथील एमईटी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, दवाखाने गटात अपोलो, रहिवासी गटात पंचवटीतील पार्क साईड, शासकीय संस्थांच्या गटात जेलरोड येथील विद्युत पारेषण केंद्र आणि बाजारपेठ गटात सिटी सेंटर मॉलने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
महापालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयांच्या अंतर्गत असलेल्या विभागातील हॉटल्स, शाळा व कॉलेज, दवाखाने, रहिवासी संकुल, शासकीय संस्था व बाजारपेठ या आस्थापनांचा महापालिकेच्या वतीने सर्वे करण्यात आला. यावेळी स्वच्छतेबाबत जागृती करून त्यांची पाहणी करण्यात आली. त्यासाठी १ ते २६ नोव्हेंबर २०२० या कालावधीमध्ये कालबध्द कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्यानुसार महापालिकेच्या सहाही विभागांमध्ये त्यांना नेमून देण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार अंमलबजावणी करून विभागस्तरावर प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाच्या आस्थापनांची निवड करण्यात आली आहे. विभागस्तरावर निवड करण्यात आलेल्या आस्थपनांमधून शहरातील प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाच्या आस्थापनांची निवड करण्याकरता आयुक्तांनी समिती स्थापन केली होती. त्यानुसार या समितीने विभागांकडून आलेल्या अहवालानुसार आस्थपनांची निवड करण्याकरता बैठक घेऊन त्यात विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालांच्या अनुषंगाने आस्थापनांची प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाची निवड करण्यात आली आहे.

स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे

हॉटेल्स विभाग


प्रथम- ताज हॉटेल
व्दितीय- एक्सप्रेस इन
तृतीय एसएसके

शिक्षण विभाग


प्रथम- एमईटी इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी
व्दितीय- सिम्बायोसीस हायस्कूल
तृतीय- मनपा शाळा क्र. ७८ अंबडगाव

दवाखाने विभाग

प्रथम- अपोलो हॉस्पिटल
व्दितीय- अशोका मेडीकव्हर
तृतीय -एचसीजी मानवता सेंटर

रहिवासी विभाग

प्रथम- पार्कसाईट
व्दितीय- सम्राट ट्रॉपिकॅना

शासकीय संस्था विभाग

प्रथम- विद्युत पारेषण केंद्र जेलरोड
व्दितीय- नाशिक विभागीय पालिका कार्यालय
तृतीय- विभागीय आयुक्त कार्यालय

बाजारपेठ विभाग

प्रथम क्रमांक- सिटी सेंटर मॉल
व्दितीय- शॉपर स्टॉप
तृतीय क्रमांक परफेक्ट डाळींब मार्केट

First Published on: February 12, 2021 9:19 PM
Exit mobile version