नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक १५ रुग्णांचा मृत्यू; २६४४ नवे कोरोनाबाधित

नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक १५ रुग्णांचा मृत्यू; २६४४ नवे कोरोनाबाधित

नाशिक : जिल्ह्यात सलग सहाव्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोन हजारांहून अधिक आढळून आली आहे. मंगळवारी (दि.२३) दिवसभरात उच्चांकी १५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये नाशिक शहर ६ आणि नाशिक ग्रामीणमधील ९ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात २ हजार ६४४ नवे रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये नाशिक शहर 1 हजार 480, नाशिक ग्रामीण 827, मालेगाव 259 आणि जिल्ह्याबाहेरील ७8 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात १७ हजार २२३ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये नाशिक शहर १1 हजार १4७, नाशिक ग्रामीण ४ हजार ५६7, मालेगाव १ हजार २४४ आणि जिल्ह्याबाहेरील२६५ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण १ लाख ५३ हजार ५६१ रुग्ण बाधित आढळून आले असून १ लाख ३४ हजार ९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामध्ये नाशिक शहर ८६ हजार ८१४, नाशिक ग्रामीण ३९ हजार ६०३, मालेगाव ६ हजार ५१ आणि जिल्ह्याबाहेरील १ हजार ६२३ रुग्णांचा समावेश आहे. मंगळवारी दिवसभरात २ हजार ३९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात एकूण २ हजार २४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात संशयित २ हजार ६४२ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये दाखल झाले. जिल्हा रुग्णालयात ७, नाशिक महापालिका रुग्णालय २ हजार ४५५, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय ८, मालेगाव ४९ तर नाशिक ग्रामीण रुग्णालयात १२३ रुग्ण दाखल झाले.

First Published on: March 23, 2021 10:22 PM
Exit mobile version